वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने येमेनमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत कासीम-अल-रिमी ठार झाल्याचे म्हटले आहे. कासीम हा अल-कायदा या अरबी द्वीपकल्पातील (The Arabian Peninsula (AQAP))दहशतवादी संघटनेच्या संस्थापक नेत्यांपैकी एक होता.
'अमेरिकेने येमेनमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत कासीम-अल-रिमी या दहशतवाद्याला ठार करण्यात आले. ओसामा बिन लादेननंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख बनलेल्या अयमन-अल-जवाहिरी या दहशतवादी नेत्याच्या खालोखाल त्याची जागा होती. तो अल कायदाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक होता,' असे निवेदन व्हाईट हाऊसमधून जारी करण्यात आले आहे.
कासीम याच्या मृत्यूमुळे अल कायदाला मोठा हादरा बसेल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
अरबी द्वीपकल्पातील (The Arabian Peninsula (AQAP)) सौदी अरेबिया, येमेन, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती, कतार, ओमान या देशांच्या भूमीवर अल कायदा ही संघटना उदयाला आली.