ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य केला जो बायडेन यांचा विजय, म्हणाले... - अमेरिकेतील संसद हल्ला बातमी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव मान्य केला आहे. पुढील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असतील अशी घोषणा त्यांनी अधिकृतरित्या केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Jan 8, 2021, 9:36 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव मान्य केला आहे. पुढील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असतील अशी घोषणा त्यांनी अधिकृतरित्या केली आहे. काल (गुरुवार) डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेच्या कॅपिटॉल हिल इमारतीत धुडगूस घातल्यानंतर या घटनेचे जगभरात प्रतिसाद उमटले. हा अमेरिकेच्या लोकशाहीवरील हल्ला असल्याचा आरोप डेमोक्रटिक पक्षाने केला.

सत्तांतर सुलभपणे आणि शांततापूर्ण वातावरणात होईल -

डोनाल्ड ट्रम्प

दरम्यान, निवडणुकीत अफरातफर झाल्याच्या मतावर ते ठाम आहेत. मात्र, आता शांततापूर्ण आणि सुलभपणे सत्तांतराची प्रक्रिया पार पाडली जाईल, असे ट्रम्प यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे म्हटले. तसेच संसदेतील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध केला. दंगलखोरांनी अमेरिकेच्या लोकशाहीला डाग लावल्याचे ट्रम्प म्हणाले.

निवडणुकीतील अफरातफरीवर ठाम -

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळणं ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मला माहीत आहेत, माझे सर्व समर्थक नाराज झाले आहेत. मात्र, आपला हा प्रवास तर आत्ता सुरू झाला आहे. कोणताही पुरावा नसताना ट्रम्प यांनी निवडणुकीत अफरातफर झाल्याचा आरोप केला होता. मात्र, आता त्यांनी आपल्या वक्तव्यात बदल केला आहे. बायडेन पुढील राष्ट्राध्यक्ष होतील, यासाठी त्यांनी तयारी दर्शवली आहे.

चार आंदोलकांचा झाला मृत्यू -

आंदोलक आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीत काल चार आंदोलकांचा मृत्यू झाला तर ५० पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी संसदेचे बॅरिकेडस् तोडत आत प्रवेश मिळवला. तसेच आतील सामानाची तोडफोड केली. संसद सदस्यांना बाकाखाली लपण्याची वेळ आली. आंदोलकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.