ETV Bharat / international

नासाच्या 'जुनो'ने घेतली गुरुच्या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे - गुरू चंद्र फोटो

सात जून रोजी जुनो हे ग्यानीमीडच्या एक हजार किलोमीटर कक्षेत पोहोचले होते. यावेळी त्याने या चंद्राचे दोन फोटो घेतले. यासाठी त्याने जुनोकॅम इमेजर आणि स्टेलर रेफरन्स युनिट स्टार कॅमेऱ्याची मदत घेतली. या फोटोंमध्ये ग्यानीमीडचा पृष्ठभाग अगदीच स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये त्यावरील क्रेटर्स आणि इतर खडकाळ भागही नीट दिसून येत आहे...

see-the-first-images-nasas-juno-took-as-it-sailed-by-ganymede
नासाच्या 'जुनो'ने घेतली गुरुच्या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे
author img

By

Published : Jun 9, 2021, 3:36 PM IST

वॉशिंग्टन : गेल्या दोन दशकांमध्ये पहिल्यांदाच नासाचे एक अंतराळयान गुरू ग्रहाच्या सर्वात मोठ्या चंद्राजवळ गेले आहे. 'जुनो' असे या अंतराळयानाचे नाव आहे. या यानाने गुरुचा सर्वात मोठा चंद्र 'ग्यानीमीड'चे काही फोटो नासाला पाठवले आहेत.

सात जून रोजी जुनो हे ग्यानीमीडच्या एक हजार किलोमीटर कक्षेत पोहोचले होते. यावेळी त्याने या चंद्राचे दोन फोटो घेतले. यासाठी त्याने जुनोकॅम इमेजर आणि स्टेलर रेफरन्स युनिट स्टार कॅमेऱ्याची मदत घेतली. या फोटोंमध्ये ग्यानीमीडचा पृष्ठभाग अगदीच स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये त्यावरील क्रेटर्स आणि इतर खडकाळ भागही नीट दिसून येत आहे.

आतापर्यंत या मोठ्या चंद्राच्या जवळ पहिल्यांदाच कोणी पोहोचले आहे, असे जुनोचे मुख्य निरीक्षक स्कॉट बोल्टन यांनी म्हटले. या चंद्राबाबत आम्ही कोणतेही अनुमान काढण्याची घाई करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अनुमान काढण्यास वेळ आहे, त्यामुळे सध्या तरी आम्ही हे फोटो पाहून खुश आहोत; असेही ते म्हणाले.

see-the-first-images-nasas-juno-took-as-it-sailed-by-ganymede
नासाच्या 'जुनो'ने घेतली गुरुच्या सर्वात मोठ्या चंद्राची छायाचित्रे

जुनोकॅमने आपला ग्रीन फिल्टर वापरुन या चंद्राचा पहिला फोटो घेतला. त्यानंतर कॅमेऱ्याचे रेड आणि ब्लू फिल्टर वापरुन आणखी फोटो घेण्यात आले. या सर्व फोटोंवरुन ग्यानीमीडचा रंग निश्चित करता येईल, असे संशोधकांनी म्हटले आहे. या फोटोंचे रिझॉल्यूशन हे तब्बल १ किलोमीटर प्रति पिक्सेल आहे. यासोबतच, जुनोवरील स्टेलर रेफरन्स युनिटवरील कॅमेऱ्याने या चंद्राच्या अंधाऱ्या भागाचे (जो सूर्याच्या दिशेने नाही) कृष्णधवल छायाचित्र घेतले आहे. या फोटोंचे रिझॉल्यूशन ६०० ते ९०० मीटर प्रति पिक्सेल आहे.

येत्या काही दिवसांमध्ये जुनो या चंद्राची आणखी काही छायाचित्रे पाठवणार आहे. ग्यानीमीड हा चंद्र बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. तसेच, आपल्या सूर्यमालेतील हा एकमेव असा उपग्रह आहे, ज्याला स्वतःचा मॅग्नेटोस्फिअर आहे.

हेही वाचा : चंद्राच्या तब्बल 55 हजार फोटोतून साकारला एकच अद्भुत फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.