ETV Bharat / international

रिपब्लिकन पक्षाच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' अभियानाला सुरुवात - डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचार न्यूज

३ नोव्हेंबरला अमेरिकेची राष्ट्राध्यक्षीय निवडणूक होत आहे. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा प्रचार काहीसा संकटात आला आहे. मात्र, यावर उपाय म्हणून रिपब्लिकन पक्षाने 'ऑपरेशन मेगा' सुरू केले आहे.

donald trump
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Oct 4, 2020, 4:46 PM IST

वॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांच्या रिपब्लिकन पक्षाने 'ऑपरेशन मेगा' सुरू केले आहे. कोरोनाची लागण झाल्याने ट्रम्प सध्या उपचार घेत असून प्रत्यक्ष प्रचारापासून ते दूर आहेत. ते बरे होऊन येईपर्यंत पक्षातील इतर नेते प्रचाराचा धुरा सांभाळणार आहेत. ट्रम्प यांनी या निवडणुकीतही 'ऑपरेशन मेगा' म्हणजे 'मेक अमेरिका ग्रेट अगेन'चा नारा दिला आहे.

'ऑपरेशन मेगा'मध्ये उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यासह ट्रम्प यांच्या कुटुंबातील काही सदस्य महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये जाऊन प्रचार करणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्र्म्प यांनी ट्विट करून सांगितले होते. सध्या त्यांच्यावर अमेरिकेच्या मुख्य सैनिकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक ३ नोव्हेंबरला होत आहे. त्याअगोदरच ट्रम्प यांना कोरोना झाल्याने त्यांच्या प्रचारावर याचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन 'ऑपरेशन मेगा' सुरू करण्यात आले आहे.

उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स, ट्रम्प यांचे कुटुंबीय आणि ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असे सर्व मिळून 'ऑपरेशन मेगा' जोरात राबवणार आहेत. यातून अमेरिकन जनतेला ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार असल्याचा विश्वास दिला जाणार आहे, असे बील स्टेपीन यांनी एका प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. बील स्टेपीन हे ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियानाचे व्यवस्थापक असून काही दिवसांपूर्वी ते सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स महत्त्वाच्या राज्यांमध्ये जाऊन ट्रम्प यांचा प्रचार करणार आहेत. त्याच्या सोबत ट्रम्प यांची मुले ज्युनियर डोनाल्ड ट्रम्प, एरिक ट्रम्प आणि त्यांची पत्नी लारा हे देखील असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.