टोरंटो - कुटुंबाच्या वाईट वागणुकीला कंटाळून सौदी अरेबियातून बँकाँकला पळून आलेल्या एका तरुणीने पुन्हा कुटुंबीयांसोबत सऊदीत जाण्यास नकार दिला आहे. रहाफ अलक्यूनन, असे या तरुणीचे नाव आहे. तीचे कुटुंबीय तिला नेण्यासाठी बँकॉकमध्ये आले होते.
रहाफचे कुटुंबीय बँकॉक एअरपोर्टवर तिला घेण्यासाठी पोहोचले, तेव्हा तिने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. मात्र त्यांचा गोंधळ पाहून स्थानीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यात हस्तक्षेप केला. यानंतर रहाफने सर्व हकिकत सांगितली आणि सौदी अरेबियात जाण्यास नकार दिला. रहाफने केलेले सर्व आरोप तिच्या आई-वडिलांनी खोटे असल्याचे म्हटले आहे. आपण कॅनडात अत्यंत सुखी आहोत. आपली सर्व स्वप्ने आपण येथेच पूर्ण करू इच्छितो, असेही रहाफने म्हटले आहे.
कॅनडाचे परराष्ट्रमंत्री क्रिस्टिया फ्रिलँड यांनी अलक्यूनन टोरंटोविमान तळावर पोहोचल्यानंतर तिचे स्वागत केले तसेच 'ही आहे रहाफ अलक्यूनन, एक अत्यंत बहादूर नवीन कॅनडियन,’ असे म्हटले आहे.
अलक्यूननने विमानातील आपल्या सीटवरून दोन फोटो पोस्ट केले होते. एका फोटोत ती हातात पासपोर्ट आणि वाईनने भरलेला ग्लास घेऊन आहे, तर दुसऱ्या फोटोत तीने विमानात पासपोर्ट घेतलेला आहे आणि ‘मी करून दाखवले,’ असे लिहिले आहे.