ETV Bharat / international

पनामा : तुरुंगात गोळीबार, 12 कैद्यांचा मृत्यू - पनामातील ला जोयिता तुरुंगात गोळीबार

राष्ट्रीय पोलीस सहायक संचालक अलेक्स मुनोज यांनी अशा प्रकारची तस्करीची समस्या मोठी असल्याचे म्हटले आहे. ही तस्करी बऱ्याच काळापासून सुरू आहे. तस्करी अनेक पद्धतींनी चालत असून याद्वारे हत्यारे तुरुंगापर्यंत पोहोचवली जातात.

पनामा : तुरुंगात गोळीबार, 12 कैद्यांचा मृत्यू

author img

By

Published : Dec 18, 2019, 10:52 PM IST

पनामा सिटी - पनामातील एका तुरुंगात झालेल्या गोळीबारात तब्बल 12 कैद्यांचा मृत्यू झाला. तर, आणखी 12 जण जखमी झाले आहेत. पनामा प्रशासनातील अधिकाऱ्याने ही माहिती दिली. तुरुंगाच्या एका ब्लॉकमध्ये हा गोळीबार झाला. येथे एकाच टोळीच्या सदस्यांना ठेवण्यात आले होते.

हेही वाचा - सीरियामध्ये बॉम्बवर्षाव, एकाच कुटुंबातील सात जणांसह 23 ठार

पनामा सिटीच्या 'ला जोयिता' या तुरुंगात तस्करीच्या माध्यमातून हत्यारे आणण्यात आली होती. घटनास्थळावरून पाच पिस्तूल आणि तीन रायफल्स ताब्यात घेण्यात आल्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रीय पोलीस सहायक संचालक अलेक्स मुनोज यांनी अशा प्रकारची तस्करीची समस्या मोठी असल्याचे म्हटले आहे. ही तस्करी बऱ्याच काळापासून सुरू आहे. तस्करी अनेक पद्धतींनी चालत असून याद्वारे हत्यारे तुरुंगापर्यंत पोहोचवली जातात.

हेही वाचा - चीनमध्ये दगडी कोळसा, नैसर्गिक वायू खाणीत स्फोट, १६ जणांचा मृत्यू

गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात कोणी सुरक्षा रक्षक किंवा तुरुंगातील कर्मचारी जखमी झालेले नाहीत. तसेच, तुरुंगातून कोणीही कैदी फरार झालेला नाही.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.