न्युयॉर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये आज (मंगळवार) पुन्हा एकदा बैठक होणार आहे. ह्युस्टन येथे आयोजित 'हाऊडी मोदी कार्यक्रमामध्ये एकत्र आल्यानंतर ३६ तासांच्या आत दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा बैठक होणार आहे. दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांसह दहशतवादावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
PM Narendra Modi to meet US President Donald Trump at 12:15 pm (local time) today
— ANI Digital (@ani_digital) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/62BrItbaI9 pic.twitter.com/wIybXhiIP6
">PM Narendra Modi to meet US President Donald Trump at 12:15 pm (local time) today
— ANI Digital (@ani_digital) September 24, 2019
Read @ANI Story | https://t.co/62BrItbaI9 pic.twitter.com/wIybXhiIP6PM Narendra Modi to meet US President Donald Trump at 12:15 pm (local time) today
— ANI Digital (@ani_digital) September 24, 2019
Read @ANI Story | https://t.co/62BrItbaI9 pic.twitter.com/wIybXhiIP6
या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रामध्ये उभारण्यात आलेल्या सोलार पार्कचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या इमारतीमध्ये भारताने स्व:खर्चाने सोलार प्रकल्प उभारला आहे. त्यानंतर मोदींना 'ग्लोबल गोलकिपर अवार्ड'ने सन्मानित करण्यात येणार आहे. बिल अॅड मेलिंडा गेटस् फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार मोदींना देण्यात येणार आहे.
पुढील २ दिवस मोदींचे वेळापत्रक पूर्णपणे व्यस्त राहणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री ९.४५ वाजता मोदी ट्रम्प यांना भेटणार आहेत. त्यावेळी अमेरिकेमध्ये दुपारचे सव्वा बारा वाजलेले असतील. तसेच आज भारतीय वेळेनुसार रात्री १०.४५ वाजता मोदी संयुक्त राष्ट्रातर्फे राष्ट्राध्यंक्षांना दिल्या जाणाऱ्या मेजवाणीमध्ये सहभागी होणार आहेत.
२५ तारखेला मोदी इंडिया पॅसिफिक आर्यलंड देशांशी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सहभागी होतील. महात्मा गांधीच्या १५० व्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्येही मोदी सहभागी होणार आहेत.