ETV Bharat / international

विनामास्क रुग्णालयात गेल्यानं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्यावर टीका

author img

By

Published : Apr 29, 2020, 12:23 PM IST

रुग्णालय भेटीचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. त्यात पेन्स विनामास्क लोकांना भेटताना दिवस आहेत. मायो रुग्णालयातील कोनापासून बऱ्या झालेल्या कर्मचाऱ्याशीही त्यांनी संवाद साधला.

mayo clinic
माईक पेन्स यांची मेयो क्लनिकला भेट

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी मिनिसोटा राज्यातील मेयो क्लिनिक रुग्णालयाला भेट दिली. मात्र, भेटीवेळी मास्क न घातल्याने पेन्स यांच्यावर टीका होत आहे. जगविख्यात रुग्णालयाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

रुग्णालय भेटीचे व्हिडिओ फुटेज समोर आले आहे. त्यात पेन्स विनामास्क लोकांना भेटताना दिवस आहेत. मायो रुग्णालयातील कोरोनापासून बऱ्या झालेल्या कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. ज्या ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जातात तेथेही पेन्स यांनी भेट दिली.

पेन्स यांच्या बरोबरच्या इतर सर्व सहकाऱ्यांनी मास्क घातले होते. रुग्णालायने उपराष्ट्राध्यक्ष कार्यालयाला नियमावलीची माहिती दिली होती. असे ट्विट रुग्णालय प्रशासनाने केले होते. मात्र, नंतर लगेच अकांऊटवरून काढून टाकण्यात आले.

काय म्हणाले पेन्स ?

उपराष्ट्राध्यक्ष असल्यामुळे माझी आणि माझ्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांची कायम कोरोना चाचणी होते. ज्यांना कोरोना झाला आहे, त्यांच्यापासून संसर्ग टाळण्यासाठी मास्क घातले पाहिजे, अशी सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची नियमावली आहे. त्याचे मी पालन करत आहे. विनामास्क वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधता आला. ते खुप चांगले काम करत आहेत, असे पेन्स म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.