वॉशिंग्टन : पहिल्यांदाच केवळ महिलांचा समावेश असलेला 'स्पेसवॉक' या आठवड्यामध्ये पार पडणार आहे. नासाच्या अंतराळवीर क्रिस्टीना कोच आणि जेसिका मेर या १७ किंवा १८ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाबाहेर स्पेसवॉक करतील. साधारणपणे साडेसहा तासांचा हा स्पेसवॉक असेल, अशी माहिती नासाने दिली.
-
.@Space_Station update: our first all-female spacewalk with @Astro_Christina and @Astro_Jessica will be Thursday or Friday to replace a faulty battery charge-discharge unit. We’ll have a telecon later today. More details: https://t.co/0T6OOfuQQc pic.twitter.com/zQ7cH4fIBg
— Jim Bridenstine (@JimBridenstine) October 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">.@Space_Station update: our first all-female spacewalk with @Astro_Christina and @Astro_Jessica will be Thursday or Friday to replace a faulty battery charge-discharge unit. We’ll have a telecon later today. More details: https://t.co/0T6OOfuQQc pic.twitter.com/zQ7cH4fIBg
— Jim Bridenstine (@JimBridenstine) October 15, 2019.@Space_Station update: our first all-female spacewalk with @Astro_Christina and @Astro_Jessica will be Thursday or Friday to replace a faulty battery charge-discharge unit. We’ll have a telecon later today. More details: https://t.co/0T6OOfuQQc pic.twitter.com/zQ7cH4fIBg
— Jim Bridenstine (@JimBridenstine) October 15, 2019
अंतराळ स्थानकाच्या व्यवस्थापकांनी या स्पेसवॉकची नियोजित वेळ पुढे ढकलल्यामुळे आता हा स्पेसवॉक १७ किंवा १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. बॅटरी चार्ज/डिस्चार्ज युनिटमधील (बीसीडीयू) सदोष पावर युनिट बदलण्यासाठी हा स्पेसवॉक करण्यात येणार आहे.
हेही वाचा : मेक्सिकोत सुरक्षा दल- शस्त्रधारी टोळक्यामधे गोळीबार, एका जवानांसह १५ जणांचा मृत्यू
याआधी ११ ऑक्टोबरला अंतराळ स्थानकाच्या ट्रसवर नवीन लिथियम-आयन बॅटरी बसवण्यात आली होती, मात्र त्यानंतरही बीसीडीयू सुरु झाला नाही. बीसीडीयूच्या सुरु न होण्यामुळे स्टेशनवरील कामकाज तसेच तिथल्या लोकांच्या सुरक्षिततेवर किंवा तिथल्या प्रयोगशाळेत सुरु असलेल्या प्रयोगांवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, पावर युनिटच्या बंद असण्याने नव्यानेच बसवलेली लिथियम-आयन बॅटरी ही निरूपयोगी ठरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केवळ महिलांचा हा स्पेसवॉक खरेतर मार्चमध्ये होणार होता. मात्र, या स्पेसवॉकसाठी लागणारे विशेष स्पेससूट वेळेवर तयार न झाल्यामुळे, याची नियोजित वेळ पुढे ढकलावी लागली.
आतापर्यंत एकूण १५ महिलांनी स्पेसवॉक केला आहे. मात्र, या महिलांसोबत किमान एक पुरुष सहकारी उपस्थित होताच. त्यामुळेच, कोच आणि मेर यांचा स्पेसवॉक हा विशेष ठरणार आहे. कोच यांचा हा चौथा स्पेसवॉक असणार आहे, तर मेर यांचा हा पहिलाच स्पेसवॉक असणार आहे.
हेही वाचा : 'हाँगकाँमध्ये आतापर्यंत २,२०० आंदोलकांना झाली आहे अटक'