ETV Bharat / international

इडा चक्रीवादळाचा फटका; अमेरिकेच्या ईशान्य भागात 45 हून अधिक जणांचा मृत्यू - इडा चक्रीवादळ मृत्यू

न्यूयॉर्क शहरात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामध्ये 11 जणांचा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये मृत्यू झाला आहे. हे नागरिक परवडणाऱ्या घरांमध्ये राहत होते.

इडा चक्रीवादळ
इडा चक्रीवादळ
author img

By

Published : Sep 3, 2021, 12:38 PM IST

न्यूयॉर्क - एकीकडे कोरोनाचे संकट दुसरीकडे चक्रीवादळ अशा स्थितीला अमेरिकेतील काही राज्ये सामोरे जात आहेत. इडा चक्रीवादळाचा अमेरिकेच्या पूर्व सागरी किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. वादळाने मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या संख्येत वरचेवर वाढ होत आहे. गुरुवारी झालेल्या विक्रमी पाऊसामुळे 40 हून अधिक नागरिकांचा घरात आणि कारमध्ये जमा झालेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

अमेरिकेच्या ईशान्य भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर मुसळधार झालेल्या पावसामुळे मेरीलँडमध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी सुमारे 46 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-पंजशीरमध्ये तालिबानी घुसले? शोटुल जिल्हा ताब्यात घेतल्याचा दावा

न्यू जर्सीमध्ये किमान 23 जणांचा मृत्यू झाल्याचे न्यू जर्सीचे डेमोक्रॅटिक गव्हर्नर फिल मर्फी यांनी सांगितले. न्यूयॉर्क शहरात 13 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामध्ये 11 जणांचा अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये मृत्यू झाला आहे. हे नागरिक परवडणाऱ्या घरांमध्ये राहत होते.

पेन्नीसिलिव्हिनियामध्ये किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाचा झाड कोसळून मृत्यू झाला. तर कारमध्ये अडकलेल्या पत्नीला मदत केल्यानंतर पतीचा पावसाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. मेरीलँडमध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-Afganistan Crisis: अफगाणिस्तानात आज होणार तालिबान सरकारची घोषणा

न्यूयॉर्कमध्ये एका इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचले पावसाचे पाणी-

न्यूयॉर्कमधील सोफी लू या महिलेने सांगितले, की अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर पाणी येत होते. हे पाणी थांबविण्यासाठी टॉवेल आणि गार्बेज बॅग्जचा वापर केला. कसेबसे मुलाला लाईफ जॅकेट दिले. दरवाजातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पावसाच्या पाण्यामुळे दरवाजा निघणे शक्य झाले नाही. मित्रांना फोन करून बोलाविले. मी खूप घाबरले होते. मात्र, मुलासाठी मला खूप धैर्यवान होण्याची गरज होती. त्यामुळे मी शांतपणे राहण्याचा प्रयत्न केला. तिने पोलिसांना बोलाविल्यानंतर अपार्टमेंटमधून तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने यापूर्वीच आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. चालू वर्षात भारताच्या काही सागरी किनारी भागांना यास आणि तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला होता.

हेही वाचा-20 वर्ष, 2 ट्रिलियन डॉलर...मुदतीआधीच सैन्य माघारी परतलं; जाणून घ्या काय म्हणाले बायडेन...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.