हैदराबाद : मास्क म्हणजे दोन बाजूंनी ओढता येईल असे बँड लावलेले कापड असते. तुम्ही तुमचे तोंड आणि नाक झाकण्यासाठी तोंडावर लावता. जगापासून बचाव करण्यासाठी ते लावले जाते. एकूणच मास्क एक सर्वसाधारण वस्तू आहे. मात्र, हाच मास्क अमेरिकेत वादाचे मोठे कारण झाला आहे. अनेक अमेरिकन्स कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य शिफारसींचे पालन करतात. पण काही जण याविरोधात लढत आहेत. ते म्हणतात, यामुळे आमच्या स्वातंत्र्यावर गदा येते.
अमेरिकेत मास्कवरून नक्की काय वादंग आहे?
सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, जास्तीत जास्त अमेरिकन्स सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरतात. पण व्यवसायाच्या ठिकाणी आणि स्थानिक सरकारांनी मास्क अनिवार्य करावा, हा एक राजकीय प्रश्न झाला आहे. नुकतेच पु रिसर्च सेंटरने केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, डेमोक्रेट्स हे रिपब्लिकन्सपेक्षा मास्कचा वापर जास्त करतात.
दोन पक्षांच्या नेत्यांचा हा आहे संदेश
- डेमोक्रॅटिक नेते - ते मास्क घालण्याचे महत्त्व सगळ्यांना सांगतात. अनेक डेमोक्रॅटिक राज्यपालांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.
- रिपब्लिकन नेते - त्यांनीही चेहऱ्यावर मास्क लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. पण काही उच्च रिपब्लिकन्स मास्क अनिवार्य करण्यास तयार नाहीत. त्यांच्या राज्यात लाॅकडाऊन संपल्यानंतर आता पुन्हा नवे रुग्ण सापडायला लागलेत, तरीही ते मास्क बंधनकारक करायला का-कू करत करत आहेत. यात सर्वात महत्त्वाचे नेते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प स्वत:च आहेत. त्यांनी मास्कचे रूपांतर ‘सांस्कृतिक युद्धा’त केले आहे.
अमेरिकेत मास्कविरोधात प्रतिक्रिया कधीपासून यायला लागल्या?
लाॅकडाऊनच्या विरोधात आंदोलने सुरू झाली, तेव्हा ती मास्क न लावता झाली. राज्यांनी त्यांची अर्थव्यवस्था रुळावर आणायला सुरुवात केली, तेव्हा राष्ट्रीय आणि प्रादेशिक व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांना दुकानात असताना मास्क लावणे अनिवार्य केले. अशा प्रकारे या मास्क वादात व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारी अग्रगणी आहेत.
लोकांचा मास्कला का विरोध आहे?
- मास्क घालणे हा आपल्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला असल्याचे मास्क नाकारणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे.
- एका महिलेने सुनावणीत सांगितले की ‘ही कम्युनिस्ट हुकूमशाही आणि कायद्याचे बंधन आणून तुम्ही आमचे स्वातंत्र्य आणि घटनात्मक हक्क हिरावून घेत आहात.’
- काही तज्ज्ञांच्या मते या मास्क विरोधामागचे कारण म्हणजे साथीच्या रोगाच्या सुरुवातीलाच सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून आलेला संदेश. आरोग्य अधिकाऱ्यांनी लोक संभ्रमात पडतील असा संदेश दिला होता.
आता सार्वजनिक आरोग्य अधिकारी मास्क घालण्याबद्दल काय म्हणत आहेत?
आता सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ एकमताने मास्क घातल्याने कोविड-१९ पसरण्याचा वेग मंदावतो यावर सहमत आहेत. सीडीसी (देशातील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रे) आणि जागतिक आरोग्य संघटना सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग अशक्य असेल, तेव्हा मास्क लावणे योग्य असल्याचे सांगतात.
जरी एकमेव मास्क विषाणूचा संसर्ग रोखू शकत नसेल तरी नुकत्याच झालेल्या संशोधनात हे समोर आले आहे की, मास्क वापरणे म्हणजे संसर्ग रोखण्याचा जास्त प्रभावी उपाय आहे. नुकतेच फौसी एके ठिकाणी म्हणाले,
‘मास्क हा राजकीय मुद्दा असू नये. हा पूर्णपणे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे.’ आपल्या राज्यात कोविडचे रुग्ण वाढत असताना टेक्सासचे राज्यपाल ग्रेज अॅबाॅट म्हणाले, ‘सरकारकडून लोकांच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन होत नाही ना, हे निश्चित करायला हवे आणि सरकारने मास्क घालणे ही लोकांची गरज करू नये.’