ETV Bharat / international

खशोग्गी यांच्या प्रेयसीने सौदी क्राउन प्रिन्सविरोधात केली फिर्याद दाखल

author img

By

Published : Oct 25, 2020, 6:42 PM IST

Updated : Oct 25, 2020, 6:48 PM IST

हत्या करण्यात आलेले पत्रकार जमाल खशोग्गीचा यांची तुर्की येथे राहणारी प्रेयसी हॅटिस सेनगिझ यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर खशोग्गी यांच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप करत फिर्याद दाखल केली आहे. 'सौदी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या खशोग्गी यांची मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरून हत्या करण्यात आली,' असे त्यात म्हटले आहे.

खशोग्गी
खशोग्गी

वॉशिंग्टन - हत्या करण्यात आलेले पत्रकार जमाल खशोग्गीचा यांची तुर्की येथे राहणारी प्रेयसी हॅटिस सेनगिझ यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यावर खशोग्गी यांच्या हत्येचा आदेश दिल्याचा आरोप करत फिर्याद दाखल केली आहे.

हॅटिस सेनगिझ आणि खशोग्गी यांनी खशोग्गी यांच्या मृत्यूपूर्वी स्थापन केलेल्या डेमॉक्रसी फॉर अरब वर्ल्ड नाऊ (डॉन) ने मंगळवारी वॉशिंग्टन डीसीमध्ये फिर्याद दाखल केली.

फिर्यादीत खशोग्गीच्या मृत्यूमुळे सेनगिझ यांनी वैयक्तिक नुकसान व आर्थिक नुकसानीचा दावा केला आहे. तर, अधिकार समूहाने त्याच्या संचलनात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप केला आहे.

'या हत्येचा हेतू स्पष्ट होता, अरब जगतात लोकशाही सुधारणा घडवून आणण्यासाठी अमेरिकेत शिफारस करून लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार्‍या खशोग्गी यांना रोखणे,' असे एका वृत्तसंस्थेने या खटल्याच्या हवाल्याने म्हटले आहे.

'सौदी सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या खशोग्गी यांची मोहम्मद बिन सलमान यांच्या आदेशावरून हत्या करण्यात आली,' असे त्यात म्हटले आहे.

हेही वाचा - लिबियाच्या सामूहिक कबरींमध्ये सापडले 12 मृतदेह

हा खटला दाखल झाल्यानंतर सेनगिझ आणि अधिकार संघटनेच्या वकिलांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले की, अमेरिकेच्या न्यायालयाने सौदी क्राउन प्रिन्स यांना हत्येस जबाबदार धरून सत्य उघड करणारी कागदपत्रे मिळविण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

'जमाल यांचा असा विश्वास होता की, अमेरिकेत काहीही शक्य आहे आणि मी न्याय व उत्तरदायित्व मिळवण्यासाठी अमेरिकन सिव्हिल जस्टिस प्रणालीवर विश्वास ठेवते,' असे सेनगिझ यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

2 ऑक्टोबर, 2018 रोजी इस्तंबूलमधील सौदी काउन्सलेटच्या भेटीदरम्यान सौदी एजंट्सच्या पथकाने जमाल खशोग्गी या सुप्रसिद्ध पत्रकारची हत्या केली होती. सेनगिझ यांच्याशी लग्न करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी ते तिथे गेले होते.

सौदी क्राउन प्रिन्स यांनी या हत्येत आपला हात असल्याचे नाकारले आहे.

हेही वाचा - १८० जिहादी कैद्यांना मुक्त करण्याचा माली सरकारचा निर्णय

Last Updated : Oct 25, 2020, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.