वॉशिंग्टन डी. सी - तालिबानने काबूलचा ताबा घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी चर्चा केली. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर बायडेन यांची परदेशी नेत्याशी झालेली ही पहिलीच चर्चा होती.
अफगाणिस्तानमधील घडामोडींबाबत पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशी बोलताना, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी काबुलमधील अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी काम करत असलेल्या सैनिकांच्या आणि अमेरिकन नागरिकांच्या शौर्याचे कौतुक केले. अफगाणिस्तानसंदर्भातील पुढील रणनिती आणि दृष्ट्रीकोनावर चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात जी7 नेत्यांची बैठक बोलवण्यात यावी, यावर दोघांचे एकमत झाले.
तालिबानी ताकद वाढली -
अफगाणिस्तानमधील परिस्थिती चिघळली आहे. पूर्वीपेक्षा अधिक तालिबानी ताकद वाढली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी तालिबान्यांसमोर शरणागती पत्करात रविवारी (१५ ऑगस्ट) राजीनामा दिला. ते देश सोडून तझाकिस्तानला पळून गेले आहेत. संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये अराजकाचे वातावरण पसरले आहे.
अमेरिकेने 2 हजार 450 जवान गमावले -
अफगाणिस्तानमधून सैन्य वापसीच्या निर्णयावर बायडेन ठाम आहेत. अफगाण सैनिक त्यांच्या देशाचे संरक्षण करू शकत नसतील. तर यास अमेरिकेच सैन्य तिथे आणखी एक किंवा पाच वर्ष थांबले तरी काही फरक किंवा बदल होणार नाही. तसेच एका दुसऱ्या देशाच्या गृहयुद्धात अमेरिकन सैन्याची उपस्थिती स्वीकारहार्य नाही, असे बायडेन म्हणाले. 2001 पासून अफगाणिस्तानात तालिबानबरोबरच्या लढ्यात अमेरिकेने 2 हजार 450 जवान गमावले आहेत.
हेही वाचा - अफगाणिस्तानात भारताने केली आहे ४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, आता तालिबानी मांडताहेत उच्छाद
हेही वाचा - काबूलमधून उड्डान भरलेल्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये आणि चाकांमध्ये आढळले मृतदेह