ETV Bharat / international

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय

'हा भारताच्या प्रयत्नांचा मोठा विजय आहे. आम्ही अनेक वर्षे यासाठी लढा दिला. आज हे उद्दिष्ट साध्य झाले,' असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे.

मसूद अझहर
author img

By

Published : May 1, 2019, 7:54 PM IST

Updated : May 1, 2019, 8:25 PM IST

वॉशिंग्टन - पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार असलेल्या मसूदला बुधवारी (दि.१) मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यता आले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने (युएनएससी) याची घोषणा केली. हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय मानण्यात येत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे.

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या मंजूर यादीमध्ये मसूद अझहरचा आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून समावेश करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. यूएनएससीत ज्यांनी भारताला साथ दिली त्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले आहेत. 'हा भारताच्या प्रयत्नांचा मोठा विजय आहे. आम्ही अनेक वर्षे यासाठी लढा दिला. आज हे उद्दिष्ट साध्य झाले,' असे अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.

भारताकडून आतापर्यंत ४ वेळा मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडे प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, प्रत्येक खेपेस व्हिटो अधिकाराचा वापर करत चीनने यामध्ये खोडा घातला होता. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या या मागणीला अमेरिका, फ्रान्स, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठिंबा दिला. यामुळे चीनवर आंतराराष्ट्रीय पातळीवर राजकीय दबाव निर्माण करण्यात भारताला यश आले. अखेर चीनला आपल्या भूमिकेत बदल करत नरमाईचे धोरण स्वीकारावे लागले. पाकिस्तानला आणि पाकिस्तानचे नागरिक असणाऱ्या दहशतवाद्यांना वारंवार वाचवणाऱ्या चीनने यू-टर्न घेतल्यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला आहे.

आता मसूदवर येणार निर्बंध

आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यानंतर आता मसूद अझहर पाकिस्तान सोडून इतर कुठल्याही देशात जाऊ शकणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या कुठल्याही सदस्य देशाला मसूदला अर्थपुरवठा किंवा हत्यारे पुरवता येणार नाहीत. यामुळे मसूदची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे कंबरडे मोडले जाणार आहे. मसूदच्या अटकेसाठी पाकिस्तानवर आता दबाव वाढेल किंबहुना पाकिस्तानला त्याच्यावर कारवाई करणे भाग पडणार आहे.

Intro:Body:

Nat 01

Conclusion:
Last Updated : May 1, 2019, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.