ETV Bharat / international

भारताने इराणी कच्च्या तेलाची आयात थांबवली, अमेरिकेकडून मिळणारा सवलतीचा कालावधी संपल्याने निर्णय - waivers expired

'मागील महिन्यात अमेरिकेने इराणसोबत व्यापार करण्यासाठी ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यास नकार दिला. यानंतर भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे थांबवली आहे. ' अशी माहिती भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रिंग्ला यांनी दिली आहे.

इराण
author img

By

Published : May 25, 2019, 12:15 PM IST

वॉशिंग्टन - भारताने इराणकडून केली जात असलेली कच्च्या तेलाची आयात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणी तेलाच्या ८ खरेदीदार देशांना दिलेला सवलतीचा कालावधी संपला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अणुकार्यक्रमावरून तेहरानवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांनुसार कारवाई करणारा भारत हा पहिला देश बनला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

इराणने २०१५ मधील तेहरान आणि इतर ६ देशांसोबतच्या अणू करारांतून माघार घेतल्यानंतर अमेरिकेने इराणवर नोव्हेंबरमध्ये पुन्हा निर्बंध लागू केले होते. इराणच्या कच्च्या तेलाची निर्यात शून्यावर आणण्यासाठी अमेरिकेने तेल खरेदीदार देशांना २ मेपर्यंत मुदत दिली होती. यात भारताचाही समावेश होता. ६ महिन्यांपर्यंत इराण कडून तेल आयात बंद करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

'मागील महिन्यात अमेरिकेने इराणसोबत व्यापार करण्यासाठी ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यास नकार दिला. यानंतर भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे थांबवली आहे. ' अशी माहिती भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी दिली आहे. याआधी एप्रिलमध्येच भारताने इराणकडील कच्च्या तेलाची खरेदी २.५ दशलक्ष टनांवरून १ दशलक्ष टनांवर आणली होती.

भारताने इराण आणि व्हेनेझ्युएअलाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवली आहे. त्यामुळे भारताला आता ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी पर्यायी स्रोतांची गरज पडणार आहे. आधी इराण भारताच्या इंधनाच्या गरजेपैकी १० टक्के कच्च्या तेलाची गरज पुरवत होता.

Intro:Body:

india stopped purchasing iranian oil after us waivers expired

india, iranian oil, america, donald trump,  waivers expired, hassan rouhani

------------------------

भारताने इराणी कच्च्या तेलाची आयात थांबवली, अमेरिकेकडून मिळणारा सवलतीचा कालावधी संपल्याने निर्णय

वॉशिंग्टन - भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने इराणी तेलाच्या ८ खरेदीदार देशांना दिलेला सवलतीचा कालावधी संपला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे अणुकार्यक्रमावरून तेहरानवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांनुसार कारवाई करणारा भारत हा पहिला देश बनला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

इराणने २०१५ मधील तेहरान आणि इतर ६ देशांसोबतच्या अणू करारातून माघार घेतल्यानंतर अमेरिकेने इराणवर नोव्हेंबरमध्ये पुन्हा निर्बंध लागू केले होते. इराणच्या कच्च्या तेलाची निर्यात शून्यावर आणण्यासाठी अमेरिकेने तेल खरेदीदार देशांना २ मेपर्यंत मुदत दिली होती. यात भारताचाही समावेश होता. ६ महिन्यांपर्यंत इराण कडून तेल आयात बंद करण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

'मागील महिन्यात अमेरिकेने इराणसोबत व्यापार करण्यासाठी ६ महिन्यांची वाढीव मुदत देण्यास नकार दिला. यानंतर भारताने इराणकडून कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे थांबवली आहे. ' अशी माहिती भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रिंग्ला यांनी दिली आहे. याआधी एप्रिलमध्येच भारताने इराणकडील कच्च्या तेलाची खरेदी २.५ दशलक्ष टनांवरून १ दशलक्ष टनांवर आणली होती.

भारताने इराण आणि व्हेनेझ्युएअलाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवली आहे. त्यामुळे भारताला आता ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी पर्यायी स्रोतांची गरज पडणार आहे. आधी इराण भारताच्या इंधनाच्या गरजेपैकी १० टक्के कच्च्या तेलाची गरज पुरवत होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.