ETV Bharat / international

गुन्हेगारी संघटनेचे 'डी-कंपनी' या दहशतवादी नेटवर्कमध्ये परिवर्तन हा खरा धोका - भारत - terror network

दाऊद इब्राहिम भारतामध्ये 'वाँटेड' आहे. त्याला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. डी-कंपनी, जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटना उद्ध्वस्त करण्यासाठी संघटित कारवाईच्या मुद्द्यावर अकबरुद्दीन यांनी विशेष भर दिला.

सय्यद अकबरुद्दीन
author img

By

Published : Jul 10, 2019, 10:25 AM IST

न्यूयॉर्क - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीचे गुन्हेगारी संघटनेतून दहशतवादी संघटनेतील परिवर्तन, हा या भागातील खरा धोका असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रसंघात म्हटले आहे. 'आमच्या भागात आम्ही दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी संघटनेचे दहशतवादी नेटवर्कमध्ये परिवर्तन होताना पाहिले आहे. याला डी-कंपनी म्हणून ओळखले जाते,' असे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत आणि कायमस्वरूपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.

'डी कंपनीच्या बेकायदेशीर आर्थिक हालचाली इतर ठिकाणी फारशा माहिती नसतील. मात्र, आमच्यासाठी सोन्याची तस्करी, खोटे चलन, शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी हा आमच्यासाठी सध्याचा खरा धोका आहे. यांचे सुरक्षित आश्रयस्थान त्यांचे अस्तित्वाची माहितीही असल्याचे नाकारत आहे,' ही बाब सय्यद यांनी ठळकपणे मांडली. अकबरुद्दीन यांनी 'आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला असलेले धोके' यावरील चर्चेत हा मुद्दा मांडला.

दाऊद इब्राहिम भारतामध्ये 'वाँटेड' आहे. त्याला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

'दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा आता गुप्त नाही. बऱ्याच काळापासून पाकिस्तानला त्यांच्या देशात असलेल्या दहशतवाद्यांची यादी देण्यात येत आहे. दाऊदला वारंवार भारताच्या ताब्यात द्यावे, असे पाकिस्तानला वारंवार सांगण्यात आले आहे. त्याचा मुंबई बॉम्बस्फोटातील सहभाग असल्याचे स्पष्ट आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले होते.

डी-कंपनी, जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटना उद्ध्वस्त करण्यासाठी संघटित कारवाई करण्याच्या मुद्द्यावर अकबरुद्दीन यांनी विशेष भर दिला.

'अवैध कृत्यांमधून येणारा पैसा भारताच्या सीमेबाहेर पाठवला जात आहे. याचे व्यवहार बेधडकपणे खुल्या 'नेटवर्क'द्वारे केले जात आहेत. ही माया हिंसा आणि दहशतवाद पसरवण्यासाठी वापरली जात आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी संघटतिपणे आंतर्देशीय पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत. तसेच, प्रादेशिक आणि आंतरप्रादेशिक पातळीवरही प्रयत्न केले जावेत,' असे सय्यद यांनी या चर्चेत म्हटले.

Intro:Body:

india at un d company mutation from crime syndicate to terror network a real danger

india, united nations, d company, dawood ibrahim, mutation, crime syndicate, terror network, danger

--------------

गुन्हेगारी संघटनेचे डी-कंपनी या दहशतवादी नेटवर्कमध्ये परिवर्तन हा खरा धोका - भारत

न्यूयॉर्क - कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीचे गुन्हेगारी संघटनेतून दहशतवादी संघटनेतील परिवर्तन हा या भागातील खरा धोका असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रसंघात म्हटले आहे. 'आमच्या भागात आम्ही दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी संघटनेचे दहशतवादी नेटवर्कमध्ये परिवर्तन होताना पाहिले आहे. याला डी-कंपनी म्हणून ओळखले जाते,' असे भारताचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत आणि कायमस्वरूपी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे.

'डी कंपनीच्या बेकायदेशीर आर्थिक हालचाली इतर ठिकाणी फारशा माहिती नसतील. मात्र, आमच्यासाठी सोन्याची तस्करी, खोटे चलन, शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी हा आमच्यासाठी सध्याचा खरा धोका आहे. यांचे सुरक्षित आश्रयस्थान त्यांचे अस्तित्वाची माहितीही असल्याचे नाकारत आहे,' ही बाब सय्यद यांनी ठळकपणे मांडली. अकबरुद्दीन यांनी 'आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला असलेले धोके' यावरील चर्चेत हा मुद्दा मांडला.

दाऊद इब्राहिम भारतामध्ये 'वाँटेड' आहे. त्याला १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

'दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा आता गुप्त नाही. बऱ्याच काळापासून पाकिस्तानला त्यांच्या देशात असलेल्या दहशतवाद्यांची यादी देण्यात येत आहे. दाऊदला वारंवार भारताच्या ताब्यात द्यावे, असे पाकिस्तानला वारंवार सांगण्यात आले आहे. त्याचा मुंबई बॉम्बस्फोटातील सहभाग असल्याचे स्पष्ट आहे,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले होते.

डी-कंपनी, जैश-ए-मोहम्मद आणि लश्कर-ए-तैयबासारख्या दहशतवादी संघटना उद्ध्वस्त करण्यासाठी संघटित कारवाई करण्याच्या मुद्द्यावर अकबरुद्दीन यांनी विशेष भर दिला.

'अवैध कृत्यांमधून येणारा पैसा भारताच्या सीमेबाहेर पाठवला जात आहे. याचे व्यवहार बेधडकपणे खुल्या 'नेटवर्क'द्वारे केले जात आहेत. ही माया हिंसा आणि दहशतवाद पसरवण्यासाठी वापरली जात आहे. सर्व देशांनी एकत्र येऊन हे थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी संघटतिपणे आंतर्देशीय पातळीवर प्रयत्न आवश्यक आहेत. तसेच, प्रादेशिक आणि आंतरप्रादेशिक पातळीवरही प्रयत्न केले जावेत,' असे सय्यद यांनी या चर्चेत म्हटले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.