ETV Bharat / international

कोरोनाविरूद्ध तयार अँटीबॉडीज शरीरात अनेक महिने टिकू शकतात, संशोधनातून स्पष्ट - कोरोनाविरुद्ध रोगप्रतिकार शक्ती बातमी

कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात ते बरे झाल्याच्या ५ ते ७ महिन्या उच्च क्षमतेच्या अँटीबॉडीस तयार झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाल्याचे अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसर दीप्ती भट्टाचार्य म्हणाल्या.

संशोधनातून स्पष्ट
संशोधनातून स्पष्ट
author img

By

Published : Oct 14, 2020, 1:49 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका संशोधकाच्या नेतृत्वात केलेल्या अभ्यासानुसार सार्स-कोव्ह २ ची लागण झाल्यानंतर कोरोना विरूद्धची प्रतिकारशक्ती कमीतकमी पाच महिने टिकू शकते. अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी कोरोना संक्रमित जवळपास ६ हजार लोकांच्या शरीरातील नमुने गोळा करून त्यांच्यातील अँटीबॉडी तयार होण्याच्या प्रक्रियेवर अभ्यास केला.

कोरोनामुक्त रुग्णांच्या शरीरात ते बरे झाल्याच्या ५ ते ७ महिन्या उच्च क्षमतेच्या अँटीबॉडीस तयार झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाल्याचे अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या असिस्टंट प्रोफेसर दीप्ती भट्टाचार्य म्हणाल्या.

जेव्हा एक विषाणू पहिल्यांदा मानवी शरीरातील पेशींना संक्रमित करतो, तेव्हा शरीरातील रोगप्रतिकारक रक्षा प्रणाली विषाणूशी दोन हात करणाऱ्या अँटीबॉडीज तयार करते, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या अँटीबॉडीज शरीरातील संक्रमणाच्या १४ दिवसानंतर रक्ताच्या नमुना परिक्षणात दिसतात, असेही त्यांनी सांगितले.

दीपा भट्टाचार्य आणि जानको निकोलाइच-जुगीच यांनी अनेक महिने अभ्यास करून अँटीबॉडीच्या क्षमतेचा अभ्यास केला. या संशोधनादरम्यान मानवी शरीरात सार्स-कोव्ह २ च्या विरुद्ध लढणाऱ्या अँटीबॉडीज शरीरात कमीतकमी ५ ते ७ महिन्यांसाठी असतात असे सांगितले.

हेही वाचा - 'डोनाल्ड ट्रम्प यांना फक्त स्वत:ची काळजी, जनतेशी काही देणे-घेणे नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.