ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव - महाभियोग प्रक्रियेला सुरुवात

गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर म्हणजेच कॅपिटॉल हिल इमारतीवर हल्लाबोल केला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले आहे.

ट्रम्प यांच्या महाभियोग प्रक्रियेला सुरुवात

author img

By

Published : Jan 12, 2021, 11:53 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - गेल्या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर म्हणजेच कॅपिटॉल हिल इमारतीवर हल्लाबोल केला होता. यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अमेरिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. डेमॉक्रॅटीक पक्षाने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा खटला चालविण्याासाठी प्रस्ताव आणला आहे. सशस्त्र हिंसाचार घडवून आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

अमेरिकेच्या २५ व्या घटनादुरुस्तीनुसार उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी एक आदेश जारी करावा. त्यानुसार ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदी राहण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट करावे. त्यानंतर महाभियोग चालविण्यात येईल. मात्र, डेमॉक्रॅटिक पक्षाच्या या मागणीला रिपब्लिकन पक्षाने नकार दिला आहे. आधी महाभियोगावर संसदेत चर्चा व्हावी, असे काही नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या काही नेत्यांनीही ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवाला असे म्हटले आहे.

अणू शस्त्रांचा गैरवापर होण्याची चिंता-

नॅन्सी पेलोसी यांनी अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांशीही चर्चा केली आहे. ट्रम्प यांच्याकडून अणू शस्त्रांचा गैरवार होऊ शकतो का? ही चिंता त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांकडे आण्विक शस्त्रे आणि हल्ल्याचा आदेश देण्याचे सर्वाधिकार आहेत. या अधिकारांचा गैरवापर होऊ नये म्हणून पेलोसी यांनी लष्करप्रमुख मार्क मेली यांच्याशी चर्चा केली. मेली यांनी असे काही होणार नसल्याचे आश्वस्त केल्याचे पेलोसी यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्याकडून पदाचा गैरवापर होऊ शकतो, असे नॅन्सी पेलोसी यांनी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाभियोग चालविण्याची मागणी त्यांनी केली आहे.

सहा जानेवारीला संसदेच्या इमारतीत हिंसाचार -

६ जानेवारीला अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प समर्थकांची रॅली आयोजित करण्यात आली होती. यास ट्रम्प यांचाही पाठिंबा होता. रॅली सुरू असताना जमाव हिंसक झाला. सुरक्षा कवच तोडून आंदोलकांनी संसदेच्या इमारतीत घुसून धुडगूस घातला. यावेळी झालेल्या हिंसाचारात चार जणांना मृत्यू झाला. तर पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. या घटनेचे संपूर्ण जगातून पडसाद उमटले. आता विरोधी पक्ष डेमोक्रॅट्सने ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू केली आहे. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यास फक्त ८ दिवस राहीले असतानाही त्यांच्यावर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा - बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यावर ट्रम्प सरकारच्या आणीबाणीचे सावट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.