वॉशिंग्टन - अमेरिकेत कोविड - 19 च्या संसर्गामुळे गेल्या 24 तासांत 3 हजारपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिलनंतरचे एका दिवसातील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती दिली आहे.
बुधवारी अमेरिकेत एकूण 3 हजार 71 रुग्ण मृत्युमुखी पडले. यासह देशातील मृतांचा आकडा 2 लाख 89 हजार 283 पर्यंत वाढला आहे, अशी माहिती सिन्हुआने दिली आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंगने (सीएसएसई) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी बायडेन यांचा शपथविधी साधेपणानं
मंगळवारी, यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या पॅनेलच्या बैठकीत निर्णय झाला की, कोविड - 19 वरील लस सर्वात प्रथम देशभरातील आरोग्य सेवा कर्मचारी आणि दीर्घावधी काळजी घेणाऱ्या लोकांना देण्यात येतील.
सीडीसीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत 2 लाख 40 हजारांहून अधिक आरोग्यसेवा कामगारांना विषाणूची लागण झाली असून त्यातील 858 जण आतापर्यंत मरण पावले आहेत.
हेही वाचा - बनावट लसींचा धोका : कोविड-19 लसी संघटित गुन्ह्यांचे लक्ष्य बनू शकतात, इंटरपोलचा अलर्ट