ETV Bharat / international

मानवी अवयव घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले; तिघे जखमी - Los Angeles Helicopter crash

खासगी एअर अ‌ॅम्ब्युलन्स असलेले हे हेलिकॉप्टर सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (यूएससी) केक हॉस्पिटलच्या छतावर कोसळले. यावेळी दान केलेले जे अवयव या हेलिकॉप्टरमधून नेण्यात येत होते, अपघातानंतरही ते सुरक्षित असल्याचे आढळून आले.

Helicopter delivering human organ crashes in Los Angeles
मानवी अवयव घेऊन जाणारे हेलिकॉप्टर कोसळले; तिघे जखमी
author img

By

Published : Nov 7, 2020, 12:16 PM IST

वॉशिंग्टन : दान केलेले मानवी अवयव घेऊन जाणारे एक हेलिकॉप्टर लॉस एंजेलिसच्या एका इमारतीवर कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. यावेळी सुदैवाने हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या तीनही लोकांचा जीव वाचला आहे. या तिघांनाही किरकोळ दुखापत झाली.

सुदैवाने आग लागली नाही..

खासगी एअर अ‌ॅम्ब्युलन्स असलेले हे हेलिकॉप्टर सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या (यूएससी) केक हॉस्पिटलच्या छतावर कोसळले. सुदैवाने या अपघातानंतर आग लागली नाही, तसेच हेलिकॉप्टरमधून इंधन गळतीही झाली नसल्याचे लॉस एंजेलिस अग्निशामक विभागाने स्पष्ट केले. या अपघातानंतर हेलिकॉप्टरच्या चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मानवी अवयवही सुरक्षित..

यावेळी दान केलेले जे अवयव या हेलिकॉप्टरमधून नेण्यात येत होते, तेदेखील अपघातानंतर सुरक्षित असल्याचे आढळून आले. यानंतर लॉस एंजेलिसच्या अग्निशामक कर्मचाऱ्यांनी हे अवयव यूएससी केक रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. हे अवयव आता गरजूंच्या शरीरात ट्रान्सप्लांट करण्यात येत आहेत, अशी माहिती रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : ....म्हणून लागतोय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निकालाला उशीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.