वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 3 लाख 97 हजार 446 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आत्तापर्यंत जगभरात 68 लाख 39 हजार 429 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 3 लाख 97 हजार 446 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 33 लाख 31 हजार 959 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत. तर दरम्यान देशातून कोरोना महामारीचा संपूर्णपणे नायनाट झाल्याचे जाहीर करणारा स्लोव्हेनिया हा पहिला युरोपियन देश ठरला आहे.