गेल्या २४ तासांमध्ये जगभरात कोरोनाचे ७३ हजार नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३,४६,९७४ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात जगभरात कोरोनामुळे ५,२४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाच्या जगभरातील बळींची संख्या ७४,७०२वर पोहोचली आहे.
जगात सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत (३,६७,३८५) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (१,३६,६७५), इटली (१,३२,५४७), जर्मनी (१,०३,३७५) आणि फ्रान्सचा (९८,०१०) क्रमांक लागतो. तसेच, सर्वाधिक बळींची नोंद इटलीमध्ये (१६,५२३) झाली आहे. त्यापाठोपाठ स्पेन (१३,३४१), अमेरिका (१०,८७६), फ्रान्स (८,९११), आणि इंग्लंडचा (५,३७३) क्रमांक लागतो.
इटलीमध्ये एका दिवसात सुमारे १४०० लोकांचा बळी गेला, तर चीनमध्ये काल एकाही बळीची नोंद झाली नाही. तसेच, जगभरात आतापर्यंत २,७८,६९८ लोकांवरील उपचार यशस्वी झाले आहेत.
हेही वाचा : ..तर आम्ही भारताचा सूड घेऊ; ट्रम्प यांची धमकी!