गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे सुमारे ८० हजार नवे रुग्ण समोर आले, तर सुमारे सहा हजार नव्या बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जगभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १०,१५,८५० वर पोहोचली आहे. तर जगभरात कोरोनाचे ५३,२१६ बळी गेले आहेत.
अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक (२,४५,१८४) रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ इटली (१,१५,२४२), स्पेन (१,१२,०६५), आणि चीनचा (८१,६२०) क्रमांक लागतो. तर जगात सर्वाधिक बळी इटलीमध्ये (१३,९१५) आढळून आले आहेत. त्यापाठोपाठ स्पेन (१०,३४८), अमेरिका (६,०८८), आणि फ्रान्सचा (५,३८७) क्रमांक लागतो.
दरम्यान, भारतातील रुग्णांची संख्या २,३०१ वर पोहोचली आहे. तर, देशात आतापर्यंत ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे.
बहुतांश लोकांमध्ये या नव्या विषाणूमुळे सर्दी खोकल्यासारखी सौम्य लक्षणे आढळून येतात. सुमारे दोन-तीन आठवड्यात ही लक्षणे बरी होतात. काही जणांना, विशेषत: वयोवृद्ध आणि आधीपासूनच आजारी असलेल्या व्यक्तींना यामुळे अधिक गंभीर त्रास उद्भवू शकतो. त्यांना न्युमोनिया होऊ शकतो किंवा मृत्यू येऊ शकतो.
हेही वाचा : ट्रम्प यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह