ETV Bharat / international

कॅपिटोल हिल हिंसाचारप्रकरणी FBI कडून १७० खटल्यांचा तपास - Capitol unrest

अमेरिकेच्या सर्वोच्च तपास यंत्रणा असलेल्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) संस्थेने संसदेवरील हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. हल्ल्यात सहभाग घेतलेल्या आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली असून १७० गुन्हे दाखल केले असून ७० जणांवर चार्जशिट दाखल केले आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jan 13, 2021, 12:01 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेची सर्वोच्च तपास यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) संस्थेने संसदेवरील हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. हल्ल्यात सहभाग आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली असून १७० संशयितांवर गुन्हे दाखल केले आहेत. यातील ७० जणांवर चार्जशिट दाखल करण्यात आले आहे. ६ जानेवारीला ट्रम्प समर्थकांनी संसदेच्या कॅपिटोल हिल इमारतीत धुडगूस घालत तोडफोड केली होती.

संशयितांचा शोध सुरू -

वॉशिंग्टन डी. सी राज्याच्या सरकारी वकील मिशेल शेरविन यांनी पत्रकार परिषद घेत तपासाची माहिती दिली. १७० गुन्हे दाखल केले म्हणजे एवढ्या व्यक्तींचा हिंसाचारात सहभाग असू शकतो. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. कायद्याचे उल्लंघन, हत्यार बाळगने, स्वयंचलित शस्त्राचा वापर, गोंधळ घातल्याप्रकरणीचे हे सर्व गुन्हे आहेत, असे मिशेल म्हणाल्या.

महाभियोगाची प्रक्रिया सुरू -

दरम्यान, मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळास अवघे ७ दिवस बाकी राहिले असताना डेमॉक्रॅटिक पक्षाने त्यांच्या विरोधात महाभियोगाचा खटला चालवण्यासाठी प्रस्ताव मांडला आहे. मात्र, हा प्रस्ताव घाईगरबडीने पास न करता सविस्तर चर्चा करावी, असे मत काही सदस्यांनी मांडले आहे. अमेरिकन राज्यघटनेच्या कलम २५ नुसार ही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, कलम २५ मला कोणताही धोका नसल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.