सॅन फ्रान्सिस्को - पुढील वर्षी 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन हे पदभार स्वीकारतील, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प आपला ट्विटरवरील विशेषाधिकार गमावतील. त्यांच्या ट्वीटला इतर सामान्य वापरकर्त्यांप्रमाणे समजले जाईल.
ट्विटरने जगातील नेते आणि काही इतर अधिकाऱ्यांना विशेषाधिकार दिले आहेत. ट्विटरचे नियम मोडणारे त्यांची ट्विटस लोकहिताशी जोडलेली असतील, तर ती प्रतिबंधक कारवाईतून वगळली जातील.
![डोनाल्ड ट्रम्प ट्विटर न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9477414_trmp.jpg)
द वर्जच्या अहवालानुसार, बायडेन यांनी शनिवारी व्हाईट हाऊसची निवडणूक जिंकली. यानंतर त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'ट्रम्प यांच्या खात्यावरील नियम आता इतर वापरकर्त्यांप्रमाणेच असतील. हिंसाचाराला भडकवणाऱ्या आणि मतदानासाठी किंवा कोरोनव्हायरस साथीच्या रोगासह ट्विटद्वारे दिल्या जाणाऱ्या इतर चुकीच्या माहितीवरही बंदी घातली जाईल.'
हेही वाचा - 'उपराष्ट्राध्यक्ष पदावरील मी पहिली महिला, अमेरिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार'
'जगातील नेते, उमेदवार आणि सार्वजनिक अधिकारी यांच्याकडे ट्विटरचा दृष्टिकोन या सिद्धांतावर आधारित आहे की, लोकांनी त्यांचे नेते काय बोलतात, हे पहावे आणि ते स्पष्टपणे त्यांना समजावे. याचा अर्थ असा आहे की, आम्ही इशारा व लेबल देऊ शकतो आणि विशिष्ट ट्वीटवर लोकांचा प्रवेश मर्यादित करू शकतो. या धोरणांची चौकट सध्याच्या जगातील नेते आणि कार्यालयाच्या उमेदवारांना लागू होते. जेव्हा ते त्यांची ही पदे गमावतात तेव्हा मात्र, हे सर्व त्यांच्यावर लागू होत नाही आणि त्यांना सर्वसाधारण नागरिकांप्रमाणे वागणूक दिली जाते,' असे कंपनीच्या प्रवक्त्यांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे.
हा बदल आता ट्रम्प यांच्या वैयक्तिक खात्यावर लागू होईल. 3 नोव्हेंबरपासून मतमोजणीस प्रारंभ झाल्यानंतर ट्रम्प यांनी सुमारे 37 वेळा ट्विट किंवा रीट्वीट केले आणि त्यातील 13 मध्ये ट्विटरने त्यांना इशारा दिला. यावरून ट्रम्प यांनी निवडणुकीबद्दल सांगितलेली काही किंवा सर्व सामग्री विवादित आहे आणि शक्यतो भ्रामक आणि दिशाभूल करणारी आहे, हे सिद्ध होते.
विशेष म्हणजे, ट्रम्प यांना ट्विटरद्वारे इशारे आणि लेबल देण्यात आल्यानंतर ट्रम्प यांनी 'ट्विटर आपली मर्यादा सोडत आहे,' असे म्हटले होते. ही ट्विटस ट्रम्प यांनी मतमोजणीत फसवाफसवी, आपल्या विजयाचे दावे अशा संदर्भांमध्ये केली होती. त्यांचे हे सर्व दावे आधारहीन होते.
हेही वाचा - अमेरिकेत कोरोना विषाणू कृती दलाच्या सह-अध्यक्षपदी भारतीय वंशाची व्यक्ती; बायडेन करणार घोषणा