ETV Bharat / international

'बायडन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवार' - डोनाल्ड ट्रम्प जो बायडन टीका

३ नोव्हेंबर २०२०ला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्यावर जोरदार टीक करण्याचा धडाका सुरू केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प जो बायडन
trump and Biden
author img

By

Published : Oct 14, 2020, 10:40 AM IST

वॉशिंग्टन - नोव्हेंबर महिन्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी जो बायडन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बायडन अमेरिकेच्या इतिहासातील एकमेव सर्वात वाईट उमेदवार असल्याचे, ट्रम्प यांनी म्हटले आहे.

७४ वर्षीय ट्रम्प आणि ७७ वर्षीय बायडन ३नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आमने-सामने आहेत. पेनसिल्वेनिया येथील प्रचारसभेदरम्यान ट्रम्प यांनी बायडन यांच्यावर जोरदार टीका केली. बायडन वाईट उमेदवार आहेत. त्यामुळे माझ्यावर जास्त दबाब आहे. कारण त्यांच्या सारख्या व्यक्तीकडून हार पत्कारणे, म्हणजे खूप मोठी नामुष्की आहे, असे ट्रम्प म्हणाले. बायडन एका भाषणादरम्यान मिट रोमनी यांचे नाव विसल्याचे उदाहरणही ट्रम्प यांनी दिले.

निवडणुकीला २१ दिवस बाकी असूनही ट्रम्प यांना विजयाचा विश्वास आहे. पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये एकहाती विजय मिळेल आणि व्हाईट हाऊसवर आणखी ४ वर्ष आपलीच सत्ता राहील, असे ट्रम्प म्हणाले. जर बायडन जिंकले तर चायना आणि इतर अमेरिकाविरोधी देश जिंकतील व अमेरिकेला खिळखिळे करून सोडतील. त्यामुळे जनतेनेच ठरवावे विजयी कुणाला करायचे, असेही ट्रम्प यांनी म्हटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.