वॉशिंग्टन - अमेरिकेत एका कार्यक्रमात झालेल्या वादातून गोळीबाराची घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात 20 नागरिक जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. जखमीमध्ये कामावर नसलेल्या एका महिला पोलीस अधिकऱ्याचाही समावेश आहे. ती सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती तेथील पोलिसांनी दिली.
ख्रिस्तोफर ब्राऊन(वय 17), असे मृताचे नाव आहे. दक्षिण पूर्वेच्या बाजूलाच मध्यरात्री आयोजित केलेल्या एका संगीत पार्टीवेळी हा गोळीबार झाला असल्याची माहिती तेथील पोलीस प्रमुख पीटर न्यूजहॅम यांनी दिली.
पार्टीवेळी कशावरून तरी वाद निर्माण झाला आणि त्या वादाचे स्वरूप सशस्त्र वादात झाले. गोळीबार करणाऱ्यांमध्ये तिघांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबार करण्याचा त्यांचा उद्देश अस्पष्ट होता. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले. या कार्यक्रमामध्ये जवळपास 100 नागरिक सहभागी होते. अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि पार्टीत सर्व सैरावैरा पळू लागले. काही जण जमिनीवर झोपले, तर काही कारमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. या गोळीबारात एक महिला पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना अशाप्रकारच्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमाला आमचा नेहमीच विरोध असतो, आम्ही हे सहन करू शकत नसल्याचे न्यूज हॅम म्हणाला