ETV Bharat / international

कोरोना संकटात लहान मुलांचे संरक्षण करणे गरजेचे - Chief Child Protection Veenu Kalra

कोवीड -१९ चा सर्वाधिक प्रादुर्भाव लहान मुलांना होऊ शकतो. मुलांना या संकटापासून वाचवण्याबरोबरच मुलांची जीवितहानी टाळणे आणि प्रत्येक मुलाच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

coronavirus  impact on children
coronavirus impact on children
author img

By

Published : May 1, 2020, 8:21 AM IST

न्यूयॉर्क - कोवीड -१९ चा सर्वाधिक प्रादुर्भाव लहान मुलांना होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या गुंतवणुकीला दुय्यम ठरवले जाऊ नये, असं युनिसेफने म्हटले आहे.

युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरीटा फोर आपल्या निवेदनात म्हणाल्या की, जोपर्यंत या साथीच्या रोगाचा मुलांवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष देवून त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत कोवीड -१९च्या प्रादुर्भावाने आपल्या सामायिक भविष्याचे कायमचे नुकसान केलेले असेल.

लहान मुलं आणि तरुणांचा फक्त कोवीड -१९ शी संबंधच आला नाही, तर त्यापैकी बऱ्याच जणांना कोवीड-१९ चा प्रादुर्भावही झाला आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

युनिसेफच्या आकडेवारीनुसार, जगभरातील ९९ टक्के १८ वर्षाखालील तरुण मुलं हे कोवीड -१९ मुळे प्रभावीत झालेल्या आणि लॉकडाऊनची स्थिती असलेल्या १८६ देशांत राहतात. जवळपास १ करोड ४० लाख अल्पवयीन मुलं म्हणजेच साधारणतः ६० टक्के अल्पवयीन मुलं अंशतः किंवा पूर्णपणे लॉकडाऊन असलेल्या ८२ देशात राहतात.

आपल्याला माहीत आहे की, कोणत्याही संकट काळात सर्वात जास्त फटका हा तरुण गटाला बसत असतो. हा साथीचा रोग काही फार वेगळा नाही. त्यामुळे अशा मुलांना या संकटापासून वाचवण्याबरोबरच या मुलांची जीवितहानी टाळणे आणि प्रत्येक मुलाच्या आरोग्याचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.

कोवीड -१९ ला नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी उपलब्ध पुराव्यांच्या अधारे माहिती देण्यात येत आहे. कोवीड-१९ मुळे होणाऱ्या नुकसानाची तिव्रता कमी करण्याबरोबरच यामुळे प्रभावित होणाऱ्या इतर घटकांनाही विचारात घेऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

संभाव्य जागतिक मंदीच्या भितीने आपल्या भविष्यासाठी होणारी गुंतवणूकणूक थांबवणे, या सारख्या मोहांना रोखणे गरजेचे आहे. लोकांनी शिक्षण, बालसंरक्षण, आरोग्य व पोषण, पाणी आणि स्वच्छता या क्षेत्रांत वाढीव गुंतवणूक केल्याने जगाला या संकटामुळे होणारे नुकसान कमी करण्यास आणि भविष्यातील संकटे टाळण्यास मदत होईल, असेही फोर यावेळी म्हणाल्या.

जोपर्यंत या महामारीची लस सापडत नाही, तोपर्यंत कोवीड -१९चा जगभरातील लोकांना असणारा धोका कायम राहील. यामुळे देश आणि समुदायांना या संकटाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन फोर यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.