वॉश्गिंटन डी. सी - चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे भारतासह इतर देशही त्रस्त आहेत. चीनच्या नव्या तटरक्षक कायद्यामुळे सागरी आणि प्रादेशीक वाद वाढीस लागतील, असे अमेरिकेने म्हटलं आहे. व्हिऐतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, जपान आणि इतर देशांनी चीनच्या या नव्या कायद्यावर आपत्ती दर्शवली आहे.
चीनने दावा केलेल्या क्षेत्रात जहाजे दिसल्यास जहाजांविरोधात थेट आक्रमण करण्याची परवानगी चीनच्या तटरक्षक दलाला देण्यात आली आहे. तसेच चीनने दावा केलेल्या प्रादेशीक भागात इतर देशांनी उभारलेल्या इमरातींना पूर्व सूचना न देता भुईसपाट करण्याचा अधिकार चीनच्या अधिकाऱ्यांना मिळाला आहे.
व्हिऐतनामने चीनच्या नव्या कायद्याविरोधात भूमिका मांडली आहे. आमच्या मच्छिमारांचे संरक्षण करण्यासाठी चीनी समुद्रामध्ये शक्ती वाढवण्यात येईल, असे व्हिऐतनामने म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दक्षिणी चीन आणि पूर्व चीनी समुद्रात चीनच्या कारवाया वाढल्या आहेत.
चीनची विस्तारवादी भूमिका चिंताजनक -
चिनी सागर व दक्षिण चिनी सागरात वर्चस्व स्थापती करण्यासाठी चीनकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. गेल्या वर्षी चीनने व्हिएतनामच्या मासेमारी नौकेला जलसमाधी दिली होती. आता चिनी तटरक्षक दलाला अधिकृतरित्या मिळालेले अधिकार चीनच्या शेजाऱ्यांना आणि अमेरिकेला चिंताजनक वाटत आहेत.