सिअॅटल : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांच्या पत्नी मेलिंडा गेट्स यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. गेली २७ वर्षे ते एकमेकांसोबत होते. मेलिंडा गेट्स या मायक्रोसॉफ्टच्या सहसंस्थापकही आहेत.
दरम्यान एकमेकांपासून विभक्त होत असलो, तरी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनसाठी आपण एकत्रच काम करणार असल्याचे मेलिंडा यांनी स्पष्ट केले. ही जगातील सर्वात मोठी चॅरिटेबल फाऊंडेशन आहे. या दाम्पत्याला तीन अपत्येही आहेत.
जगातला सर्वात महागडा घटस्फोट ठरेल?
काही महिन्यांपूर्वीच अमेझॉनचे मालक जेफ बेझोस आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोट घेतला होता. हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता. मॅकेन्झी स्कॉट यांना जेफ यांच्या संपत्तीतील चार टक्के वाटा (३६ दशलक्ष डॉलर्स) मिळाला होता. बिल गेट्स हेदेखील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यामुळे घटस्फोटानंतर त्यांच्या संपत्तीची वाटणी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
१९९४मध्ये झालं होतं लग्न..
मेलिंडा या १९८७मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाल्या होत्या. १९९४ला हवाईमध्ये बिल आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. २००० साली त्यांनी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली होती.
हेही वाचा : महामारीने भारतामध्ये झालेल्या स्थितीबद्दल शी जिनपिंग यांना चिंता-चीनच्या राजदुताची माहिती