वॉशिंग्टन - युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीच्या मतदानाला फक्त तीनच दिवस उरले आहेत. या अगोदर झालेल्या नवीन सर्व्हेत डेमोक्रेटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आघडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. जो बायडेन आठ नॅशनल मतांनी आघाडीवर आहेत.द
एका खासगी वृत्तवाहिनाचा सर्व्हे शुक्रवारी समोर आला आहे. यामध्ये ५२ टक्के मतदारांनी जो बायडेन यांना पाठिंबा दिला असून ४४ टक्के मतदारांनी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करण्याचे संकेत दिले आहेत. तर दोन टक्के मतदारांनी तिसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पसंती दिली असून इतर २ टक्के मतदारांनी आणखी कोणाला मतदान करावयाचे ते ठरविले नाही.
प्रचारात बायडेन आघाडीवर
उल्लेखनिय बाब म्हणजे अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार जो बिडेन यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. अमेरिकास्थित भारतीय लोकांनी देखील जो बिडेन यांच्याच नावाला पसंती दिली आहे. दुसरीकडे ट्र्म्प यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली होती. त्याचा फटकाही ट्रम्प यांना बसू शकतो.