ETV Bharat / international

लव्ह द स्टार्स.. चांदण्यांसोबत साजरा करा व्हेलेंटाईन डे! - लव्ह द स्टार्स संकल्पना

दिवसेंदिवस होणाऱ्या लाईट(प्रकाश) प्रदूषणामुळे चांदण्यांनी भरलेल्या आकाशाचा नजारा दिसणं कठीण होत चालले आहे. याबाबत जागृती आणि उपाययोजना करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी एक भन्नाट कल्पना सुचवली आहे. येत्या 14 फेब्रुवारीला सर्वत्र व्हेलेंटाईन डे साजरा होणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी 'लव्ह द स्टार्स' ही संकल्पना नागरिकांसमोर मांडली आहे.

Representative image
प्रातिनिधिक छायाचित्र
author img

By

Published : Feb 12, 2020, 8:09 PM IST

वॉशिंग्टन डी. सी. - काही ठिकाणी आणि काही गोष्टी या चांदण्यांनी भरलेल्या आकाशापेक्षा सुंदर असतात. मात्र, पृथ्वीवर अशी काही ठिकाणं आहेत जेथे काळ्या कुट्ट अंधारात चांदण्यांनी भरलेले आकाश जास्त सुंदर दिसते. दिवसेंदिवस होणाऱ्या लाईट(प्रकाश) प्रदूषणामुळे चांदण्यांनी भरलेल्या आकाशाचा नजारा दिसणं कठीण होत चालले आहे. याबाबत जागृती आणि उपाययोजना करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी एक भन्नाट कल्पना सुचवली आहे. येत्या 14 फेब्रुवारीला सर्वत्र व्हेलेंटाईन डे साजरा होणार आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी खगोलशास्त्रज्ञांनी 'लव्ह द स्टार्स' ही संकल्पना नागरिकांसमोर मांडली आहे.

हेही वाचा - 'कोरोना व्हायरस'ला COVID-19 नावं देण्यामागे काय आहे कारण?

प्राचीन काळापासून रोमांस, प्रेम, कला, लेखन या गोष्टींसाठी आकाश अनेकांना प्रेरणादायी ठरले आहे. मात्र, काळाच्या ओघात तंत्रज्ञानातील बदलांमुळे लाईट प्रदूषणात वाढ झाली. जास्त प्रकाश देणाऱ्या आणि वीज कमी जाळणाऱ्या दिव्यांमुळे लाईट प्रदूषणात वाढ होत आहे. याचा परिणाम रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या चांदण्यांवर होतो. खगोलशास्त्रज्ञांनी या व्हेलेंटाईन डेला 10 दिवसांची मोहीम राबवली आहे. या मोहिमेमध्ये उघड्या डोळ्यांनी ताऱ्यांचे निरीक्षण करण्याचे आवाहन लोकांना केले आहे आणि आपली निरीक्षणे नोंदवण्याचेही सांगितले. यातून कुठल्या ठिकाणी किती लाईट प्रदूषण झाले आहे याबाबत माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.