दिल्ली - अमेरिकेच्या ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी शहरात ४ जणांची हत्या करण्यात आली. त्यापैकी एक जण भारतीय नागरिक असून इतर तिघे हे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत. परराष्ट्रमंत्री सुष्मा स्वराज यांनी ट्विटरवरून यासंबंधी माहती दिली.
अमेरिकेतील भारतीय राजदूत यांनी भारतीय दूतावासातून सिनसिनाटी शहरात एकाच ठिकाणी चार जणांची हत्या झाल्याची माहिती मला मिळाली. मृतांमध्ये एक व्यक्ती भारतीय असून इतर तिघे भारतीय वंशाचे नागरिक आहेत, अशी माहिती सुष्मा स्वराज यांनी दिली. दरम्यान, हा हल्ला वंशवादाच्या प्रकरणातून झाल्याची शक्यता त्यांनी नाकारली आहे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत असून आमचे न्यूयॉर्कमधील दूतावासाचे अधिकारी पोलिसांच्या संपर्कात आहेत. घटनेची सत्यता पडताळल्यानंतर योग्य तो खुलासा होईल. त्यासंबंधी अधिक माहिती भारतीय दूतावासाकडून मला पुरवण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.