ETV Bharat / international

इराणसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कतारमध्ये अमेरिकन F-22 फायटर विमाने तैनात - 22 stealth fighters planes

'आमच्या दिशेने एक गोळी सुटली तरी बघा,' असा इशारा इराणकडून देण्यात आला होता. 'इराण अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र-देशांच्या मध्य-पूर्वेतील हिताची राखरांगोळी करू शकतो,' अशी धमकीही इराणने दिली होती.

F-22 फायटर विमाने
author img

By

Published : Jun 29, 2019, 10:20 PM IST

वॉशिंग्टन - मागील काही आठवड्यांपासून इराणसोबत तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कतारमध्ये एफ-२२ स्टेल्थ फायटर विमाने तैनात केली आहेत. अमेरिकेकडून प्रथमच असे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकन सैन्य आणि हिताच्या रक्षणासाठी एफ-२२ स्टेल्थ विमाने तैनात केल्याचे अमेरिकन हवाई दलाच्या केंद्रीय लष्करी कमांडकडून सांगण्यात आले आहे. मात्र, एफ-२२ ची नेमकी किती विमाने तैनात केली ते स्पष्ट केलेले नाही.

america iran tension
अमेरिका-इराण तणाव

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरच्या अणू करारातून माघार घेऊन आर्थिक निर्बंध लादले त्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेने प्रतिहल्ल्याची तयारी सुद्धा केली होती. त्यासाठी इराणमधील लक्ष्य देखील निश्चित केले होते. पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये ट्रम्प यांनी आपला निर्णय बदलला. एक मानवरहीत ड्रोन पाडण्याच्या बदल्यात १५० लोकांचा प्राण घेणे आपल्याला योग्य वाटले नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या माघारीच्या निर्णयावर सांगितले.

यानंतर 'आमच्या दिशेने एक गोळी सुटली तरी बघा,' असा इशारा इराणकडून देण्यात आला होता. 'इराण अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र-देशांच्या मध्य-पूर्वेतील हिताची राखरांगोळी करू शकतो,' अशी धमकीही इराणने दिली होती.

Intro:Body:

------------

इराणसह तणावाच्या पार्श्वभूमीवर कतारमध्ये अमेरिकन F-22 फायटर विमाने तैनात

वॉशिंग्टन - मागील काही आठवड्यांपासून इराणसह तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कतारमध्ये एफ-२२ स्टेल्थ फायटर विमाने तैनात केली आहेत. अमेरिकेकडून प्रथमच असे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकन सैन्य आणि हिताच्या रक्षणासाठी एफ-२२ स्टेल्थ विमाने तैनात केल्याचे अमेरिकन हवाई दलाच्या केंद्रीय लष्करी कमांडकडून सांगण्यात आले आहे. मात्र, एफ-२२ ची नेमकी किती विमाने तैनात केली ते स्पष्ट केलेले नाही.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरच्या अणू करारातून माघार घेऊन आर्थिक निर्बंध लादले त्यानंतर दोन्ही देशात तणाव निर्माण झाला. मागच्या आठवडयात इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेने प्रतिहल्ल्याची तयारी सुद्धा केली होती. त्यासाठी इराणमधील लक्ष्य देखील निश्चित केले होते. पण शेवटच्या काही मिनिटांमध्ये ट्रम्प यांनी आपला निर्णय बदलला. एक मानवरहीत ड्रोन पाडण्याच्या बदल्यात १५० लोकांचा प्राण घेणे आपल्याला योग्य वाटले नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या माघारीच्या निर्णयावर सांगितले.

यानंतर 'आमच्या दिशेने एक गोळी सुटली तरी बघा,' असा इशारा इराणकडून देण्यात आला होता. 'इराण अमेरिकेच्या आणि त्यांच्या मित्र-देशांच्या मध्य-पूर्वेतील हिताची राखरांगोळी करू शकतो,' अशी धमकीही इराणने दिली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.