वॉशिंग्टन डी.सी - अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला असून तिथे अराजकता निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेची निर्वासन मोहीम सुरू आहे. येत्या 31 ऑगस्टपर्यंत सर्व सैन्य आणि नागरिकांना माघारी बोलवण्यात येईल, असे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटलं होते. मात्र, आता परिस्थिती पाहता 31 ऑगस्टनंतरही लोक अफगाणिस्तान सोडू शकतात. सैन्य माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही लोक अफगाणिस्तान सोडू शकतात, असे अमेरिकेचे पराराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी सांगितले. 31 ऑगस्टनंतरही काही लोकांना जर अफगाणिस्तान सोडून जाण्याची इच्छा असेल, तर त्यांना अमेरिका मदत करेल, असेही ते म्हणाले.
अजून 1500 अमेरिकन नागरिक अफगाणिस्तानमध्ये आहेत. 14 ऑगस्टपासून अमेरिकांना अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात येत आहे. येत्या मंगळवारी अमेरिकेची सैन्य माघारीची प्रकिया पूर्ण होणार होती. मात्र, 31 ऑगस्टनंतरही निर्वासन करण्यात येणार आहे. अमेरिकन अधिकारी 500 अमेरिकन नागरिकांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ब्लिंकन यांनी सांगितले. तर उर्वरित 1000 हजार जणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटलं
नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यास प्राथमिकता -
नागरिक मिळेल त्या मार्गाने तालिबानी राजवटीतून आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. मन पिळवटून टाकणारी दृश्य समोर येत आहेत. या संपूर्ण परिस्थितीला अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांना जबाबदार धरण्यात येत आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मात्र, बायडेन आपल्या निर्णयावर ठाम आहेत. सैन्य माघारीच्या निर्णयाचे बायडेन यांनी समर्थन केलं आहे. तर्कसंगत, विवेकी आणि योग्य निर्णय म्हणून याची इतिहासात नोंद होईल, असे बायडेन म्हणाले. एप्रिलमध्ये, अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन सैन्य मागे घेण्याची अंतिम मुदत निश्चित केली होती, जी आधी सप्टेंबर होती. परंतु नंतर ती ऑगस्टपर्यंत केली गेली होती. अफगाणिस्तानातून प्रत्येक नागरिकाला सुरक्षित बाहेर काढले जाईल, असे बायडेन म्हणाले.
हेही वाचा - अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यांना ओळखणेही झाले कठीण; जर्मनीत सुरू केले पिझ्झा डिलिव्हरीचे काम