नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आफ्रिका खंडातील मोझांबिक या देशाचे राष्ट्रपती फिलिप न्युसी यांच्याशी चर्चा केली. आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी वैद्यकीय मदतीबरोबरच इतर मदत भारत मोझांबिकला करेल, अशी विश्वास मोदींनी न्युसी यांना दिला.
'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिलिप न्यूसी यांच्याशी आज महत्त्वाची चर्चा झाली. भारत मोझांबिकला कायमच मदत करत राहील, वैद्यकीय मदतीसह इतर मदतही केली जाईल, असे मोदींनी ट्विट केले. मोझांबिकमध्ये राहणाऱ्या भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल मोदींनी न्यूसी यांचे आभार मानले.