बामको - शुक्रवारी मालीमधील ओगोसागौ येथील फुलानी गावावर झालेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या ३१ वर पोहोचली आहे. हा भाग मालीतील मध्यवर्ती प्रदेशात येतो. पंतप्रधान बौबौ सीस्से यांनी मृतांचा आकड्याला पुष्टी दिली आहे.
'मालीमध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण देशभरात सैन्य तैनात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान ओगोसागौमध्ये हा प्राणघातक हल्ला झाला,' असे पंतप्रधान म्हणाले.
मात्र, काही सूत्रांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा ४८ वर पोहोचला आहे. यात किमान ५ गर्भवती महिलांचा समावेश आहे, अशी माहिती येथील माध्यमांनी दिली आहे.
हेही वाचा - जबरदस्त उत्तर! काश्मीर मुद्दा काढताच जयशंकर म्हणाले, 'सिनेटर, तुम्ही काळजी करू नका....'
सूत्रांच्या माहितीनुसार, असा हल्ला होण्याची भीती येथील ग्रामस्थांमध्ये आधीच होती. त्यामुळे त्यातील बहुतेकांनी रात्रीच्या वेळी गाव सोडून आजूबाजूच्या झाडाझुडपांमध्ये आसरा घेतला होता. यामुळे मागील वेळी झालेल्या हल्ल्याच्या तुलनेत या वेळच्या हल्ल्यातील मृतांची संख्या बरीच कमी आहे. याआधी मार्च २०१९ मध्ये झालेल्या हल्ल्यात १५७ लोक मृत्युमुखी पडले होते.
अनेक प्रत्यक्षदर्शींनी ३० बंदूकधारी हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे सांगितले. तसेच, मालीच्या सैन्याने येथील बंदोबस्त काढून घेतल्यामुळेच हा हल्ला झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - संपूर्ण जगच अधिकाधिक राष्ट्रवादी बनत आहे - जयशंकर