इनेटस - नायजेरियात दहशतवादी हल्ल्यात ७१ सैनिकांचा मृत्यू झाला. इनेटस येथील लष्करी तळावर हल्ला झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.'मंगळवारी लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर, १२ सैनिक यामध्ये जखमी झाले', अशी माहिती मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. काही सेनिक अद्याप बेपत्ता असल्याचेही ते म्हणाले.
इजिप्तच्या दौऱ्यावर गेलेले राष्ट्राध्यक्ष महामदौ इस्सौफौ या दुःखद घटनेमुळे दौरा अर्ध्यावर सोडून परतले आहेत. माली देशाच्या सीमेजवळ इनेटस येथे ही घटना घडली.
अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.