नौकचोट्ट (मौरिटेनियन) - आफ्रिका खंडातील इस्लामिक रिपब्लिक ऑफ मौरिटेनिया या वायव्येकडील देशात बोटीचा भीषण अपघात झाला आहे. मौरिटेनियन किनाऱ्यावर बोट धडकून ५७ स्थलांतरित ठार झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थलांतरितांनी भरलेली ही बोट स्पेनच्या दिशेने निघाली होती. मात्र, १५ समुद्री मैलांचे अंतर पार केल्यानंतर तिचा अपघात होऊन ती बुडाली. या दुर्घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. यामध्ये ५७ स्थलांतरितांचा बुडून मृत्यू झाला. तर, आणखी ८३ जणांना वाचवण्यात यश जणांना आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संस्थेच्या माहितीनुसार, ही बोट जांबिया येथून १५० प्रवाशी घेऊन निघाली होती. या बोटीचा अपघात होऊन ती बुडाली. यातील ८३ जणांना वाचवण्यात यश आले आहे.