ETV Bharat / headlines

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता; मुंबईत पालिकेने 'हा' घेतला निर्णय - Suresh Kakani on corona testing

हळूहळू व टप्प्याटप्प्याने व्यवसाय विषयक आणि अर्थकारण विषयक विविध बाबी पुन्हा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 11, 2021, 9:12 PM IST

मुंबई - युरोप, अमेरिकेसह काही देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मुंबईतदेखील तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. रुग्णांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ची संख्या वाढवण्याचे निर्देश मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांना देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे कार्यवाही व नियोजन करण्यात येत असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. यामध्ये खाटांची उपलब्धतता वाढविणे, कोविड उपचार केंद्र व रुग्णालये इत्यादींची संख्या वाढविणे, रुग्णालये अधिक सुसज्ज करावी, कोविड चाचण्यांची संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे यांचा समावेश आहे.

या ठिकाणी कोविड बाधितांवर उपचार करण्याची सुविधा

महानगरपालिका क्षेत्रात सध्या वरळी परिसरातील एनएससीआय मध्ये उभारण्यात आलेले जम्बो कोविड रुग्णालय, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील जम्बो कोविड रुग्णालय, गोरेगाव परिसरातील नेस्को येथील जम्बो कोविड रुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सेव्हन हिल्स रुग्णालय, भायखळा व मुलुंड येथे रिचर्डसन ऍण्ड क्रुडास कंपनीच्या जागेत उभारण्यात आलेले रुग्णालय, दहिसर जम्बो कोविड रुग्णालय येथे कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येतात. तसेच कांजुरमार्ग येथील कोविड उपचार केंद्र आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितील विविध रुग्णालयांसह शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बाधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

हेही वाचा-कोरोना महामारीच्या काळात सुधारणा सुरुच राहणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

अशी आहे बेडची उपलब्धता-

महानगरपालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये जुलै अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार ३० हजार ३६४ बेड उपलब्ध आहेत. यामध्ये १७ हजार ६९७ ऑक्सिजन बेड, ३ हजार ७८८ अतिदक्षता बेड, लहान मुलांसाठी १ हजार ४६० बेड, लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता कक्षात २३० बेड आणि नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षात कक्षात (NICU) ५३ रुग्णशय्या उपलब्ध असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

हेही वाचा-स्मार्ट राखीसह साजरा करा रक्षाबंधन! गुजरातमधील तरुणीने तयार केलेल्या राखीला देशासह परदेशातही मागणी!

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हे देण्यात आले निर्देश -
कोविड बाधित रुग्णांवर यथायोग्य उपचार करण्याच्या दृष्टीने ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटे दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे अनेक ठिकाणी ‘कोविड उपचार केंद्र - १’ (COVID Care Centre - 1) आणि ‘कोविड उपचार केंद्र - २’ (COVID Care Centre - 2) उभारण्यात आली होती. यापैकी, ‘कोविड उपचार केंद्र - १’ मध्ये लक्षणे नसलेल्या कोविड बाधित रुग्णांवर उपचार केले जात होते. तर काही प्रमाणात लक्षणे असलेल्या (Mild Symptomatic) रुग्णांवर ‘कोविड उपचार केंद्र – २’ मध्ये वैद्यकीय उपचार क्रमानुसार उपचार केले जातात. यानुसार पहिल्या व दुसऱ्या लाटे दरम्यान कोविड उपचार केंद्रे उभारण्यात आली होती. त्या सर्व ठिकाणांचे निरिक्षण करून त्यांची यादी व संबंधीत तपशील अद्ययावत करण्यात येणार आहे. या ठिकाणी आवश्यक असणारे मनुष्यबळ व आवश्यक असणाऱ्या सेवा इत्यादी तपशिलाचीही नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड विषयक वैद्यकीय चाचणीबाबत -
हळूहळू व टप्प्याटप्प्याने व्यवसाय विषयक आणि अर्थकारण विषयक विविध बाबी पुन्हा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचणी (RTPCR) व ‘रॅपिड ऍण्टीजेन’ चाचणी (RAT) या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सदर वैद्यकीय चाचणी सुविधा देणा-यांकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणातील ‘किट’ ची उपलब्धतता असल्याची खातरजमा करण्याचे आणि संभाव्य आवश्यकता लक्षात घेऊन योग्य ते नियोजन व कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

हेही वाचा-OBC LIST : 127 व्या घटना दुरुस्तीचे विधेयक राज्यसभेत मंजूर, सभागृहात 'अशी' झाली चर्चा

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग -
कोविड या साथरोगाच्या प्रसारास अटकाव व्हावा, या उद्देशाने कोविड बाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. या अनुषंगाने प्रत्येक बाधित रुग्णामागे १५ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत होते. हे प्रमाण वाढवून आता प्रत्येक रुग्णामागे २० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्र आणि बाधित रुग्णांचा पाठपुरावा -
प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याच आदेश देण्यात आले आहेत.

विभागस्तरीय नियंत्रण कक्षांचा आढावा व प्रशिक्षण -
कोविड विषयक व्यवस्थापन अधिक प्रभावी व अधिक सुयोग्यप्रकारे करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (Ward War Room) कार्यरत आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या नियंत्रण कक्षांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचबरोबर संभाव्य तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन नियंत्रण कक्षांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जम्बो कोविड रुग्णालये व कोविड उपचार केंद्रांबाबत -
बृहन्मुंबई महानगरपालिकेने अल्पावधीत कार्यान्वित केलेली जम्बो कोविड रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्र इत्यादी ठिकाणी असणाऱ्या सोयी-सुविधा, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या बाबींचा पुरवठा, साफसफाई व स्वच्छता विषयक सेवा, खानपान सेवा इत्यादींबाबतदेखील आढावा घेण्यात येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे परिपूर्ण पालन -
कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या तीन नियमांचे पालन नागरिकांनी अधिकाधिक प्रभावीपणे करावे, यासाठी जनजागृतीपर कार्यवाही अधिक प्रभावी करण्यासह दंडात्मक कारवाई देखील अधिक काटेकोरपणे करण्यात येत आहे. या तीन नियमांमध्ये सार्वजनिक ठिकाण मुखपट्टी वापरणे, २ व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणे, वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर करण्यात येणारी दंडात्मक कारवाई अधिक तीव्र करण्याचे निर्देशदेखील देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.