ETV Bharat / headlines

ईटीव्ही भारतच्या पाठपुराव्यानंतर 'गणपती' उद्योजकांना शासनाचा दिलासा; कारखाने सुरू करण्यास परवानगी

राज्यात मागील 40 दिवसांपासून सुरु असेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लहानमोठ्या उद्योगांना फटका बसला. त्यात गणपती मूर्ती बनवणारे देखील कारखाने बंद झाल्याने, या उद्योजकांवर आणि कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिल्याची बातमी ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. याची दखल शासनाने घेतली आहे.

Government give permission to start Ganpati factory
गणपती कारखाने सुरु करण्याची शासनाची परवानगी
author img

By

Published : May 6, 2020, 1:20 PM IST

रायगड - सर्वांची सर्व विघ्न दुर करणारा गणपती बाप्पा स्वतः कोरोनामुळे संकटात सापडल्याची बातमी 'विघ्नहर्त्यावर कोरोनाचे विघ्न' या मथळ्याखाली ईटीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. ईटीव्ही भारतच्या या बातमीमुळे आणि सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर शासनाला गणपती उद्योजकांची व्यथा समजली असून शासनाने या सर्व उद्योजकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. रायगडचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः ही गोष्ट शासन दरबारी मांडली. त्यानंतर शासनाने, नियम आणि अटींसह गणेश मूर्ती बनवणारे कारखाने सुरु करण्यास परवाणगी दिली आहे.

हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : विघ्नहर्त्यावर कोरोनाचे विघ्न !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु केल्याने सर्वच व्यवसायिकांना याचा फटका बसला होता. सर्वांचा लाडका बाप्पा, विघ्न दुर करणाऱ्या गणरायालाही कोरोनाचा फटका बसला. गणपती मूर्ती निर्माण करणारे कारखानेही लॉकडाऊनमुले बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला होता. अखेर, शासनाने गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना कारखाना सुरू करण्याची परवानगी देत, त्यांना मोठा दिलासा दिला आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी गणपती कारखानदारांची ही समस्या शासन दरबारी मांडली होती.

लॉकडाऊनमुळे गणेश मूर्ती कारखाने होते बंद...

करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण देशासह राज्यातही 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे आपल्या रोजगाराची चिंता असणाऱ्या अनेकांसह बाप्पाची मूर्ती साकारणाऱ्या मूर्तीकारांची देखील चिंता वाढली होती. गणेशोत्सवासाठी अवघे साडे तीन महिन्याचा कालावधी राहिला असताना गणेश मूर्ती साकारणारे कारखाने मात्र बंद होते. तसेच मूर्ती साकारण्यासाठी लागणारी माती आणि इतर साहित्य उपलब्ध होत नसल्याने कारखानदार अडचणीत होते. या समस्यांबाबत ईटीव्ही भारतने विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण तालुक्यातील मूर्तीकारांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची प्रत्यक्ष भेट घेवून आपल्या समस्या मांडल्या होत्या.

पालकमंत्र्यांनी केला पाठपुरावा...

गणेश मूर्ती कारखानदारांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी शासनाकडे लॉकडाऊन काळात कारखाने सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार आता शासनाने गणेश मूर्ती साकारण्यासाठी कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

कारखाने सुरु करण्यास सशर्त परवानगी...

शासनाने गणेश मूर्ती बनवणारे कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी अनेक अटी लावण्यात आल्या आहेत. कारखान्यात काम करताना मजूरांनी मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.