ETV Bharat / headlines

कोरोनाचा संसर्ग झालेल्या अमेरिकेतील पहिल्या श्वानाचा मृत्यू - जर्मन शेफर्ड श्वानाचा मृत्यू

कोरोनाचा संसर्ग झालेल्या श्वानाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना अमेरिकेत घडलीआहे. ‘जर्मन शेफर्ड’ जातीच्या श्वानाचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील बर्‍याच प्राण्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत 12 श्वान, 10 मांजरी, एक वाघ आणि एक सिंह पीडित असल्याचे आढळले आहे.

श्वान
श्वान
author img

By

Published : Jul 31, 2020, 12:22 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना संसर्गाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जगभरातील १ कोटी पेक्षा अधिक लोकांना या संसर्गाची बाधा झाली आहे. तसेच माणसांप्रमाणे प्राण्यांना सुद्धा याची बाधा होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झालेल्या अमेरिकेतील पहिल्या ‘जर्मन शेफर्ड’ श्वानाचा मृत्यू झाला आहे.

एप्रिल महिन्यात ‘जर्मन शेफर्ड’ श्वानाला श्वास घेण्यास त्रास होत होता. तेव्हा त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते, असे स्टेटन आयलँडमधील रॉबर्ट आणि अ‍ॅलिसन यांनी नॅशनल जिओग्राफिकला सांगितले. रॉबर्ट आणि अ‍ॅलिसन यांनी त्याचे 'बडी' असे नाव ठेवले होते.

कोरोनाची लागण झालेला न्यूयॉर्कमधील 'जर्मन शेफर्ड' हा देशातील पहिला श्वान आहे, असे अमेरिकेच्या कृषी विभागाने जूनमध्ये वृत्त दिले होते. कोरोनाची लागण झाल्यावर त्यांची प्रकृती अधिकच खराब झाली होता. त्याचा 11 जुलै मृत्यू झाला आहे. दरम्यान, 'बडी' च्या रक्त चाचणीत कर्करोगाचाही शोध लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे त्याचा मृत्यू झाला का, हे समजू शकले नाही.

अमेरिकेतील बर्‍याच प्राण्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आतापर्यंत 12 श्वान, 10 मांजरी, एक वाघ आणि एक सिंह पीडित असल्याचे आढळले आहे. प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही, परंतु असे दिसून आले आहे की, काही परिस्थितींमध्ये संक्रमण लोकांकडून प्राण्यांमध्ये पसरते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.