मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ( MPSC B Class Exam ) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२० संदर्भात न्यायालयीन प्रकरणी अंतिम निर्णय झाल्यानंतर सर्व परीक्षेचे दिनांक निश्चित करण्यात येणार ( MPSC Important Announcement About Exam ) असल्याचे एमपीएससीने म्हटले आहे.
एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी पुन्हा ( Exam Fever 2022 ) संभ्रमात पडले आहेत. एमपीएससीने ( MPSC tweet on exam ) रविवारी ट्विट करत गट ब परीक्षेचे दिनांक न्यायालयाच्या निर्णयानंतर जाहीर करणार असल्याचे ट्विट केले. त्यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी कोरोनाच्या काळातील निर्बंध, मराठा आरक्षणावरून न्यायालयीन दावे आणि इतर न्यायालयीन प्रकरणांमुळे परीक्षांचे वेळापत्रक सतत बदलत आलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पुण्यासारख्या शहरात राहून खर्च करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.
सहाय्यक केमिकल अॅनालायझरसाठी 33 पदे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगने (MPSC) विविध विभागांमध्ये वैज्ञानिक अधिकारी आणि सहाय्यक संचालक यासह विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे अधिसूचनेनुसार, एकूण 67 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये सहाय्यक केमिकल अॅनालायझरसाठी 33 पदे आणि सहाय्यक संचालक आणि वैज्ञानिक अधिकाऱ्यांसाठी 17-17 पदे आहेत. पदवी किंवा पदव्युत्तर उमेदवार नोटिसमध्ये दिलेल्या पात्रतेनुसार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आयोगाच्या अधिकृत वेबसाइट mpsc.gov.in ला भेट द्यावी लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 मे 2022 आहे.
8000 पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगास प्राप्त
सदस्य अ गट 3226, ब गट 2844 व गट 1891 आज आपल्याकडे 8000 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झालेले आहे. मागणी झालेल्या पदांपैकी गट अ साठी 2307, गट ब साठी 1383, आणि क गटासाठी 1583 एकूण 5273 पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे पुढील कारवाई सुरू झाल्याचे राज्य सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये म्हटले होते.
हेही वाचा-MPSC Recruitment : एमपीएससीच्या माध्यमातून राज्यात पंधरा हजार रिक्त पदांची भरती- राज्यमंत्री भरणे
हेही वाचा-‘एमपीएससी’च्या अभियांत्रिकी पदाचा निकाल जाहीर; स्वप्नील पाटील, अनुजा फडतरे राज्यात प्रथम