मुंबई- बोरिवलीच्या गीतांजली जैन मंदिरात सकाळी पाच वाजता प्रकाश शाह यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला. ते रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या एका मोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होते. मात्र बड्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
मुलानेही यापूर्वीच स्वीकारले मुनीत्व
प्रकाश शाह हे जामनगरच्या रिलायन्स प्लांटचे व्हाईस प्रेसिडेंट होते. प्रकाश शाह यांच्यासोबत त्यांची पत्नी यांनीदेखील जैन मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. इतकंच काय तर त्यांच्या मुलाने देखील यापूर्वीच जैन धर्माचे मुनीत्व स्वीकारल्याची माहिती नगरसेविका बिना परेश दोशी यांनी दिली आहे. शहा कुटुंब बोरिवलीच्या गीतांजली नगरीतल्या परवाना इमारतीत राहात होते.
पिता-पुत्र होते आयआयटीचे विद्यार्थी
प्रकाश शहा यांनी आयआयटी मुंबई मधून बीटेक आणि एमटेकची पदवी घेतली होती. तसेच शाह यांचा मुलगा देखील आयआयटी मुंबईच्या केमिकल डिपार्टमेंट मधून बीटेकची डिग्री घेतली आहे. तो त्याच्या शैक्षणिक वर्षात आयआयटी मुंबई मधून सिल्व्हर मेडलिस्ट होता. जेव्हा शहा यांच्या मुलाने दिक्षा घेतली तेव्हा त्याचे वय अवघे 24 वर्ष होते .