ETV Bharat / entertainment

‘योगयोगेश्वर जय शंकर’ रक्षाबंधन विशेष भागात बालकलाकार सृष्टी पगारेची होणार एन्ट्री! - Child Artist Srishti Salaries

श्रावण महिना म्हटल की अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो. याच बरोबर येते संतती रक्षणार्थ केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे महत्व देखील काही खास आहे. लवकरच योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे.

‘योगयोगेश्वर जय शंकर’ रक्षाबंधन विशेष भागा

author img

By

Published : Aug 8, 2022, 11:45 AM IST

मुंबई - श्रावण महिना लागला आहे आणि रक्षाबंधन चा सण जवळ आलाय. गेली दोन वर्षे आभासी पद्धतीने साजरा करावा लागलेला हा सण यावर्षी धूमधामीत साजरा होणार हे नक्की. श्रावण महिन्याचे हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिना म्हटल की अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो. याच बरोबर येते संतती रक्षणार्थ केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे महत्व देखील काही खास आहे. लवकरच योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे.

‘योगयोगेश्वर जय शंकर’ रक्षाबंधन विशेष भागा
‘योगयोगेश्वर जय शंकर’ रक्षाबंधन विशेष भागा

योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत जिवतीची पूजा याचे महात्म्य देखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एंट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा बनून मराठी मनावर जिने अधिराज्य गाजवले, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले अशी सगळयांची लाडकी सृष्टी पगारे या मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचे कुटुंब राहायला येणार असून त्यांचीच मुलगी पावनी. जिचा विश्वास आहे तिचा भाऊ परत येणार आहे असे तिला भास देखील होत आहेत. आता पावनीचे हे भास खरे आहेत का, तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का, बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील, हे सगळे मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

सृष्टी पगारे म्हणाली, "मी या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हा एकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. पुन्हा त्याच सोनेरी आठवणी समोर येत आहेत. तसंच आरुषसोबत काम करायला मिळतं आहे हे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरु असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा".

ह्ही वाचा - Urfi Javed: उर्फी जावेद कोकिलाबेन रुग्णालयात दाखल; जेवणही तिला आवडेना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.