ETV Bharat / entertainment

‘पावनखिंड’ या धमादेकार सिनेमापासून प्रवाह पिक्चर वर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात!

अंगावर रोमांचं आणणारं इतिहासातलं हे पान पावनखिंड या सिनेमातून पुन्हा जिवंत झालंय. प्रवाह पिक्चर या वाहिनीवरुन हाच रोमांचक इतिहास पुन्हा अनुभवता येणार आहे. ‘पावनखिंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १९ जूनला होणार आहे.

पावनखिंडचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर
पावनखिंडचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर
author img

By

Published : Jun 2, 2022, 5:34 PM IST

मुंबई - यावर्षी लॉकडाऊनच्या कचाट्यातून बाहेर पडल्यावर चित्रपट प्रदर्शनांची रीघ लागली. हिंदी चित्रपट पटापट रिलीज होऊ लागले आणि धडाधड कोसळूही लागले. हिंदी चित्रपटांची वाताहत होत होती तरीही बऱ्याच मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम धंदा केला. त्यातील एक नाव म्हणजे ‘पावनखिंड’. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम प्रेक्षकांना यातून अनुभवायला मिळाला. आता नुकत्याच सुरु झालेल्या प्रवाह पिक्चरवर ‘पावनखिंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १९ जूनला होणार आहे.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे.

पावनखिंडचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर
पावनखिंडचा वर्ल्ड टीव्ही प्रीमियर

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांमधील महापराक्रमी आणि शूरवीर असा हिरा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. 'तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!' असं म्हणत आपल्या राजासाठी प्रत्यक्ष मृत्यूलाही बाजीप्रभूंनी प्रतीक्षा करायला लावली. बांदल सेनेच्या साथीने बाजीप्रभूंनी घोडखिंडीत अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत गनिमाला थोपवून धरलं. बाजीप्रभूंच्या पराक्रमाने ही घोडखिंड खऱ्या अर्थाने पावन झाली.

अंगावर रोमांचं आणणारं इतिहासातलं हे पान पावनखिंड या सिनेमातून पुन्हा जिवंत झालंय. प्रवाह पिक्चर या वाहिनीवरुन हाच रोमांचक इतिहास पुन्हा अनुभवता येणार आहे. रविवार १९ जूनला दुपारी १ वाजता तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच हा सिनेमा पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा - अमजद खान व त्यांचे वडील जयंत यांचा 'अलवर'शी घनिष्ठ नाते, जाणून घ्या 'गब्बर'च्या वडीलांबद्दल!!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.