मुंबई - आपल्या बिनधास्त फॅशनने सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्या उर्फी जावेदने ( Uorfi Javed ) भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांना ट्विटरच्या माध्यमातून डिवचणे सुरुच ठेवले आहे. रोज काही तरी नवे ट्विट करणाऱ्या उर्फी जावेदना आता एक ट्विट ( Uorfi Javed latest post ) करुन लिहिलंय, 'उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी गं सास.' उर्फीच्या या नव्या ट्विटवर युजर्स भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.
-
Uorfi Javed la dila traas
— Uorfi (@uorfi_) January 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Chitra asi Kashi tu ga Saas
">Uorfi Javed la dila traas
— Uorfi (@uorfi_) January 10, 2023
Chitra asi Kashi tu ga SaasUorfi Javed la dila traas
— Uorfi (@uorfi_) January 10, 2023
Chitra asi Kashi tu ga Saas
ट्विटर युजर्सना उर्फी जावेदचे हे टोमणे आवडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसातील तिच्या ट्विटवर लोक म्हणी, कविता यांचा वापर करत कमेंट करतत आहेत. अनेकांनी भरपूर मीम्स बनवून या वादाला मनोरंजक बनवले आहे.
-
Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023Meri dp itni dhaasu, Chitra Meri saasu
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
उर्फीने सोमवारी दोन ट्विट करुन या वादाला धगधगीत ठेवले. पहिल्या ट्विटमध्ये तिने लिहिले होते, 'मेरी डीपी इतनी ढांसू, चित्रा मेरी सासू'. अशा प्रकारे उर्फीने चित्रा यांना सासू म्हणून संबोधत डिवचायला सुरुवात केली होती. युजर्सची वाढता रिस्पॉन्स पाहून उर्फीला फुन्हा चेव आला आणि लगेचच तिने दुसरे ट्विट केले, 'उर्फी की अंडरवेअर मे छेद नही, चित्रा ताई ग्रेट है.'
-
Uorfi ki underwear me chhed hai ,
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Chitra tai great hai ❤️❤️
">Uorfi ki underwear me chhed hai ,
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
Chitra tai great hai ❤️❤️Uorfi ki underwear me chhed hai ,
— Uorfi (@uorfi_) January 9, 2023
Chitra tai great hai ❤️❤️
उर्फीच्या या दोन्ही ट्विटवर प्रचंड प्रतिक्रिया उमटल्या. उर्फीच्या या ट्विटवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मौन बाळगले आहे. त्यांनी कोणतेही थेट उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही. मात्र समाजातील विकृतींशी आपली लढाई असल्याचे त्यांनी एक लेटेस्ट पोस्टमध्ये म्हटलंय. चित्रा वाघ यांनी तुळजापूर येथे भवानी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'महाराष्ट्राची कुलस्वामिनी,आपलं आराध्य दैवत आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यावर एक सकारात्मक ऊर्जा अंगी संचारते. आई तुळजाभवानी सर्वांना सर्वांगसुंदर सर्वव्यापी सुयश देवो अन् समाजातील विकृतीशी लढण्याचं बळ मला देतं राहो,हेचं मागणं.'
चित्रा वाघ यांची मागणी : किळसवाणे अंगप्रदर्शन करणाऱ्या मॉडेल उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई (chitra wagh police complaint) करावी, यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त यांची भेट घेत भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मागणी केली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र देऊन मॉडेल उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी (chitra wagh demand action on urfi javed) केली.
समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय : चित्रा वाघ यांनी पोलिसांना पत्राद्वारे उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली (Urfi Javed Chitra wagh controversy) नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे ? याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही. मात्र, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल, तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे. मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत. याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी (action on actress urfi javed) आहे. दरम्यान, उर्फीने केलेल्या ट्वीटवरून पुन्हा आता काही वाद होणार का? चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर काय कारवाई करण्यात येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे