मुंबई : टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने ३०वा वाढदिवस मुंबईत बॉयफ्रेंड करण कुंद्रा आणि तिच्या कुटुंबासह साजरा केला. 'स्वरागिनी' आणि 'नागिन ६' फेम तेजस्वी ही तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे फार जास्त चर्चेत असते. तेजस्वी अनेकदा सोशल मीडियावर तिचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. तेजस्वी पडद्यावर जितकी सुंदर दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यातही खूप स्टायलिश आहे. तेजस्वीच्या फॅशन सेन्सबद्दल बोलायला गेले तर ती प्रसंगानुसार तिचे आऊटफिट कॅरी करते. तिने यात खास दिवशी बॅकलेस लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
तेजस्वी प्रकाशचा वाढदिवस : या ड्रेसमध्ये ती फार जबरदस्त दिसत होती. यावेळी करणने कॅज्युअल काळ्या रंगाची पॅंट आणि निळा शर्ट काळ्या रंगाच्या टी-शर्टवर घातला होता. याशिवाय त्याने यावर शोभून दिसणारे शूजही परिधान केले होते. इंस्टाग्रामवर पापाराझी अकाउंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तेजस्वी आणि करण पत्रकारांना भेटताना आणि सेलिब्रेशनला सुरुवात करताना केक कापताना दिसले. तिने मेणबत्ती फुंकल्यानंतर एक इच्छा देखील व्यक्त केली. यावेळी तेजस्वी आणि करण फार खुश दिसले.
तेजस्वी आणि करणची प्रेम कहाणी : करण कुंद्रा आणि तेजस्वी यांची प्रेमकहाणी बिग बॉस 15 च्या घरात सहभागी असतानाच सुरू झाली. जेव्हा करण कुंद्राने कबूल केले की तेजस्वी त्याची क्रश आहे. तेव्हा गायिका आकासाच्या मदतीने त्यांनी डेटिंग सुरू केली. बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश नागिन 6 मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. ती स्वरागिनी - जोडीं रिश्तों के सूर, रिश्ता लिखेंगे हम नया, पेहरेदार पिया की, आणि संस्कार धरोहर आपनों की 2 या टीव्ही मालिकेत दिसली आहे. तसेच तिने 'खतरों के खिलाडी' 10मध्ये देखील भाग घेतला होता. तसेच 'कितनी मोहब्बत है' मधून, करण कुंद्राने 2009 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तो बेताब दिल की तमन्ना है, कितना मोहब्बत है 2, आणि दिल ही तो है यासह अनेक मालिकांमध्ये दिसला. सध्याला तो तेरे इश्क में घायाल या मालिकेत काम करत आहे.
हेही वाचा :