लॉस एंजेलिस - 'स्क्विड गेम' या कोरियन मालिकेमुळे अभिनेता ली जंग-जे याला जगभर प्रसिध्दी मिळाली. 74 व्या वार्षिक टेलिव्हिजन अकादमी पुरस्कारांमध्ये ड्रामा मालिकेतील उत्कृष्ट मुख्य अभिनेता पुरस्कार त्याला मिळाला. हा पुरस्कार जिंकणारा पहिला आशियाई अभिनेता म्हणून, त्याने दिग्दर्शक ह्वांग डोंग-ह्युकचे आभार मानले आहेत. त्याच्या भाषणादरम्यान, त्याने स्ट्रीमिंग पोर्टल नेटफ्लिक्स आणि शोच्या टीमचे आभार मानले.
या मालिकेची कथा एका स्पर्धेभोवती फिरते जेथे 456 खेळाडू, जे सर्व गंभीर आर्थिक अडचणीत आहेत. ५ अब्जपेक्षा जास्त वॅन्स जिंकण्यासाठी हे सर्वजण आपल्या प्राणांची बाजी लावून खेळतात. जीवाचा थरकाप उडवणारी ही मालिका जगभर चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर यातील कलाकार जगभर प्रसिध्दीच्या झोतात आले.
'स्क्विड गेम' या मालिकेला या वर्षी एकूण 14 एमी नामांकन मिळाले आहेत आणि या महिन्याच्या सुरुवातीला या वर्षीच्या क्रिएटिव्ह आर्ट्स एमीमध्ये चार पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे, अभिनेत्री ली यू-मी हिने जी-यॉन्गच्या भूमिकेसाठी 'स्क्विड गेम' मालिकेतील उत्कृष्ट अतिथी अभिनेत्रीसाठी सोन्याचा पुतळा मिळाला आहे.
हेही वाचा - Bigg Boss 16 Promo: सलमान खानचा दबंग अवतार... अब बारी है बिग बॉस के खेलने