टीव्हीवरील वादग्रस्त शो अशी ज्याची ओळख आहे तो मराठी बिग बॉसचा चौथा सिझन रंगतदार बनत चाललाय. बिग बॉसच्या घरात घडणाऱ्या नित्य नव्या घटना, भांडणे आणि टास्कसाठीची चढाओढ पाहायला मिळत आहे. यंदाच्या या सिझनचेही प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत आहेत. यंदाचा सिझन हा ऑल इज वेल या थीमवर आधारित आहे. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात आतापर्यंत दोन सदस्य घराबाहेर पडले आहेत. त्यानंतर आता बिग बॉसच्या घरात आता पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे. नुकताच याचा एक प्रोमो प्रसारित झाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
बिग बॉस मराठीच्या या शोमध्ये सध्या किरण माने, अमृता धोंगडे. अपूर्वा नेमळेकर, विकास सावंत, प्रसाद जवादे, त्रिशूल मराठे, यशश्री मसूरकर, योगेश जाधव हे कलाकार सातत्याने चर्चेत आहेत. बिग बॉसच्या घरात एकूण १६ स्पर्धक दाखल झाले होते. त्यानंतर अभिनेता निखिल राजेशिर्केला व अभिनेत्री मेघा घाडगे आतापर्यंत घराबाहेर पडले आहेत. आता या शोची रंजकता वाढवण्यासाठी पहिली वाईल्ड कार्ड एंट्री होणार आहे.
यासाठी पहिला प्रोमो जाहीर झाला. त्यात स्पर्धक महिला असल्याचे दिसले होते. मात्र चेहरा न दिसल्याने प्रेक्षकांचा गोंधळ झाला होता. आता हा गोंधळ संपला असून ही पहिली वाईल्ड कार्ड एंट्री स्पर्धक आहे, स्नेहलता वसईकर. स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्या, अनुराधा अशा मालिकामधून स्नेहलता वसईकरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अक्षय केळकर या आठवड्याचा कॅप्टन बनल्याने पुढील आठवड्यापर्यंत तो आता सेफ झोनमध्ये असणार आहे. त्यामुळे या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणाला घराबाहेर जावे लागणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. हा सदस्य बाहेर पडताच आज बिग बॉसच्या घरात एक वाईल्ड कार्डमधून स्नेहलताची एंट्री होणार आहे.
हेही वाचा - प्रतिभावान सौंदर्यवती ऐश्वर्या रायलाही करावा लागला अनेक वादांचा सामना